रोअरिंग फोर्क नदी
|
|
रोअरिंग फोर्क नदीचे पाणलोट क्षेत्र
|
देश
|
अमेरिका
|
राज्य
|
कॉलोराडो
|
|
उगम
|
इन्डिपेन्डन्स लेक
|
• स्थळ
|
व्हाइट रिव्हर राष्ट्रीय वन, पिटकिन काउंटी
|
• गुणक
|
39°08′38″N 106°34′04″W / 39.14389°N 106.56778°W / 39.14389; -106.56778
|
• उंची
|
१२,४९० फू (३,८१० मी)
|
|
संगम
|
कॉलोराडो नदी
|
• स्थळ
|
ग्लेनवूड स्प्रिंग्ज, गारफील्ड काउंटी
|
• गुणक
|
39°32′57″N 107°19′47″W / 39.54917°N 107.32972°W / 39.54917; -107.32972
|
• उंची
|
५,७१८ फू(१,७४३ मी)
|
लांबी
|
७० मैल (११० किमी)
|
पाणलोट क्षेत्र
|
१,४५३ मैल२ (४,७६० किमी२)[१]
|
|
पाणलोट
|
|
• स्थळ
|
संगम[१]
|
• सरासरी
|
१,२०६ फू३/से (३४.२ मी३/से)[१]
|
• लघुत्तम
|
१८० फू३/से (५.१ फू३/से)
|
• महत्तम
|
१३,००० फू३/से (३७० फू३/से)
|
|
उपनद्या
|
|
• डावीकडून
|
क्रिस्टल नदी
|
• उजवीकडून
|
फ्राइंगॅन नदी
|
रोअरिंग फोर्क नदी ही अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील कॉलोराडो नदीची उपनदी आहे. ही सुमारे ७० मैल (११० किमी) लांब असून रॉकी माउंटन पर्वतरांगेत उगम पावते आणि ग्लेनवूड स्प्रिंग्ज जवळ कॉलोराडो नदीला मिळते. या नदीच्या पाणलोट क्षेत्रात ॲस्पेनसह अनेक गावे व शहरे आहेत.
रोअरिंग फोर्क नदी पिटकिन काउंटीमध्ये रॉकी माउंटनची उपरांग असलेल्या सावाच पर्वतरांगेत इंडिपेंडन्स पासच्या पश्चिमेकडील खंडीय विभाजनावर इन्डिपेन्डन्स लेक सरोवरात उगम पावते उगवते. तेथून ॲस्पेन, वूडी क्रीक आणि स्नोमास जवळून वायव्येकडे वाहते. बेसाल्ट येथे फ्राइंगपॅन नदी हिला मिळते तर कार्बोन्डेलच्या १.५ मैल (२ किमी) दक्षिणेस क्रिस्टल नदी मिळते. रोअरिंग फोर्क नदी ग्लेनवूड स्प्रिंग्स शहरात कॉलोराडो नदीला मिळते. या नदीचे पाणलोट.हे क्षेत्र १,४५१ चौरस मैल (३,७६० चौ. किमी) असून साधारण आणि ऱ्होड आयलंड राज्याइतके आहे. नदी तिच्या बहुतेक मार्गावर खोल दरीतून वाहते. यातून व्हाइटवॉटर राफ्टिंग केले जाते. या नदीतील पाणी रॉकी माउंटनखालून केलेल्या बोगद्यातून खंडीय विभाजनरेषेच्या पूर्वेस आणले जाते व ट्विन लेक्स सरोवरांमध्ये एकत्रित केले जाते.
या नदीतील पाणी अतिशय स्वच्छ पाणी असते. जलद आणि खोल, शक्तिशाली प्रवाह असलेल्या या नदीवरून छोट्या होडक्यांतून प्रवास करता येतो.
रोअरिंग फोर्क नदीचा सरासरी वार्षिक प्रवाह १,२०६ घन फूट/से (३४.२ घन मी/से) आहे . [१]
हे सुद्धा पहा
संदर्भ