रॉयल डच शेल पी.एल.सी. (रोमन लिपी: Royal Dutch Shell plc) किंवा शेल या टोपणनावाने ओळखली जाणारी मुळातील डच, बहुराष्ट्रीय खनिज तेल कंपनी आहे. ही खनिज तेलाचे उत्पादन, शुद्धीकरण तसेच डीझेल, पेट्रोल आदी इंधनांचे वितरण करते. हेग, नेदरलँड्स येथे या कंपनीचे मुख्यालय असून लंडन, युनायटेड किंग्डम येथे मुख्य नोंदणीकृत कार्यालय आहे. शेल सर्वांत मोठी ऊर्जा कंपनी असून, महसुलानुसार सर्व क्षेत्रांतील कंपन्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावरील कंपनी आहे.[१]