रॉबर्ट एडवर्ड ली (१९ जानेवारी, १८०७:स्ट्रॅटफर्ड हॉल, व्हर्जिनिया, अमेरिका - १२ ऑक्टोबर, १८७०:लेक्झिंग्टन, व्हर्जिनिया, अमेरिका) हा अमेरिकन सेनानायक होता. अमेरिकन यादवी युद्धादरम्यान हा अमेरिकेतून विभक्त होऊ पाहणाऱ्या राज्यांचा सरसेनापती होता. ली युद्धव्यूह पारंगत होता.
१८६३मध्ये जॉर्ज मीडच्या सैन्याने याचा गेटिसबर्गच्या लढाईत पराभव केला होता.