या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो.
राही बर्वे (sa); রাহি বার্ভ (bn); राही बर्वे (hi); Rahi Barve (en); Rahi Barve (es); राही अनिल बर्वे (mr); Rahi Barve (ast) director indio (es); ভারতীয় চলচ্চিত্র পরিচালক (bn); réalisateur indien (fr); India filmirežissöör (et); फ़िल्म निर्देशक (hi); індійський кінорежисер (uk); direutor de cine indiu (ast); director de cinema indi (ca); चित्रपट दिग्दर्शक (mr); director de cinema indio (gl); Indian film director (en); regjisor indian (sq); مخرج أفلام هندي (ar); regizor de film indian (ro); במאי קולנוע הודי (he) राही अनिल बर्वे (sa); राही बर्वे (mr); Rahi Anil Barve (en); राही अनिल बर्वे (hi); Rahi Anil Barve (es)
राही अनिल बर्वे (जन्म: ४ जून १९७९) उपाख्य राही बर्वे एक भारतीय लेखक, दिग्दर्शक, व पटकथालेखक व विशेष दृश्यपरिणाम (व्हीएफएक्स) कलाकार आहेत [१] राहीच्या उल्लेखनीय कामांमध्ये मांझा हा लघुपट[२] , व तुंबाड हा चित्रपट आहे.[३]
दिग्दर्शन
२००८ साली राहीने 'मांझा' या पहिल्या लघुपटावर काम सुरू केले. झोपडपट्टीतला एक मुलगा, त्याची अज्ञान बहीण व एक विकृत पोलीस शिपाई यांच्यात गुंफलेली ही सूडकथा आहे.[४][५]
त्यानंतर २००९ साली, राहीने 'तुंबाड' या मुख्यप्रवाहातील त्यांच्या पहिल्या भयपटाची निर्मिती सुरू केली. २०१५ पर्यंत चित्रीकरण संपूनही तुंबाड एकूण नऊ वर्षं बासनात अडकून बसला होता. जुलै २०१८ मध्ये तुंबाडची पहिली झलक प्रसृत करून ऑक्टोबर २०१८मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला.[६]
वैयक्तिक आयुष्य
राही हे मराठी लेखक व कथाकार अनिल बर्वे व बँक अधिकारी प्रेरणा बर्वे या दांपत्याचे कनिष्ठ चिरंजीव आहेत. राहींचे वडील अनिल बर्वे हे हमिदाबाईची कोठी या नाटकाचे लेखक होत.[७] राहीचे आजोबा शाहीर अमर शेख संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सहभागी होते. राहीच्या मावशी[८] व लेखिका मल्लिका अमर शेख यांचा विवाह कवी व दलित कार्यकर्ते नामदेव ढसाळ, यांच्याशी झाला होता.[९] मराठी सिनेसृष्टीतील नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर, राहीच्या ज्येष्ठ भगिनी आहेत.[१०]