राधा अँड कृष्ण वॉक इन अ फ्लॉवरिंग ग्रोव्ह

  राधा आणि कृष्णा वॉक इन अ फ्लॉवरिंग ग्रोव्ह (राधा आणि कृष्ण पुष्पवाटिकेत फिरताना ) हे चित्र सुमारे १७२० मधील कोटा मास्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अज्ञात कलाकाराचे आहे. हे चित्र मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट, / एशियन आर्टच्या संग्रही आहे. []

सुरुवातीचा इतिहास आणि निर्मिती

ह्या चित्राची शाई, अपारदर्शक जलरंग आणि कागदावर सोने ही माध्यमे आहेत. ह्या चित्रात राधा आणि कृष्ण ह्यांना प्रेमी म्हणून चितारण्यात आले आहे. ह्यात कृष्ण डावीकडे बासरी वाजवत असल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र ही प्रतिमा कदाचित नंतरची आणि वेगळ्या कलाकाराने अंदाजे १७५० आणि १७७५ च्या दरम्यान केलेली असावी. हे चित्र ७ १/२ x ४ ३/८ इंच (१९.१ x ११.१ सेमी) ह्या आकाराचे आहे . []

नंतरचा इतिहास आणि प्रदर्शन

हे चित्र सध्या मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टच्या मालकीचे आहे. ही मालकी सिंथिया हेझेन पोल्स्की आणि लिओन बी. पोल्स्की फंड, २००३ ह्यांच्याद्वारे देण्यात आली आहे. २००३मध्ये Terence McInerney Fine Arts Ltd कडून संपादन केल्यापासून ते २०१९ पर्यंत सहा वेळा प्रदर्शित केले गेले आहे. सध्या २०१९ नुसार तरी ते प्रदर्शनार्थ नाही. नॅशव्हिल, टेनेसी येथील फ्रिस्ट सेंटर फॉर द व्हिज्युअल आर्ट्स आणि ब्रुकलिन, न्यू यॉर्क येथील द ब्रुकलिन म्युझियम येथे प्रदर्शित झालेल्या " विष्णू: इंडियाज ब्लू-स्किन्ड सेव्हिअर " या प्रदर्शनाचा भाग म्हणून देखील हे कर्ज दिले गेले.

संदर्भ

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!