रघुनाथ पंडित

रघुनाथ पंडित हे मराठी काव्य परंपरेतील हे एक श्रेष्ठ पंडित व कवी होत. त्यांचा जन्म बहुधा सतराव्या शतकातला असावा. परंतु त्याबद्दल वाद असून, त्यांचा काळ अनिर्णित आहे. त्यांचे संस्कृतफार्सी या भाषांवर प्रभुत्व होते. ते महाभारतातील कथा या विषयावरील मराठीतले महत्त्वाचे कवी आहेत.

जीवन

रघुनाथ पंडित हे छ. शिवाजी महाराजांच्या काळातील असावेत असे अ.का.प्रियोळकर व द.सी.पंगू यांचे अनुमान आहे.

काव्य संपदा

  • रामदास वर्णन
  • गजेंद्रमोक्ष

दमयंती स्वयंवर

त्यांची "दमयंती स्वयंवर" ही सतराव्या शतकातील मराठी भाषेतील मुख्य गणल्या जाणाऱ्या रचनांपैकी एक आहे. []

त्यातील उदाहरणादाखल एक कडवे:

तेथील एक कलहंस तटीं निजेला ।
जो भागला जलविहार विशेष केला ॥
पोटीच एक पद, लांबविला दुजा तो ।
पक्षी तनु लपवि, भूप तया पाहतो ॥१॥
~(दमयंती स्वयंवर श्लोक क्र. ४२) - संपादक अ. का. प्रियोळकर

संदर्भ

  1. ^ "संग्रहित प्रत". 2023-07-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-07-20 रोजी पाहिले.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!