स्टुटगार्टमधील सर्वात महत्त्वाची शिक्षणसंस्था असलेले स्टुटगार्ट विद्यापीठ हे जर्मनीतील उच्च दर्जाचे विद्यापीठ असून पहिल्या ९ विद्यापीठात याचा समावेश होतो. विद्यापीठात साधारण पणे १९,००० विद्यार्थी विविध प्रकारचे शिक्षण घेतात.
स्टुटगार्ट विद्यापीठाची स्थापना १८२९ साली झाली. इतर जर्मन विद्यापीठांप्रमाणे या विद्यापीठाचेही विद्यादानाबरोबर संशोधनावर भर आहे. विद्यार्थ्यांची संख्या साधारणपणे १९००० असून त्यात परदेशी विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे.
विद्यापीठाची वार्षिक उलाढाल साधारण २८ कोटी युरोंची (१.६ अब्ज रुपये) आहे त्यापैकि ११ कोटी हे केवळ संशोधनामधुन मिळणारे उत्पन्न आहे. जर्मनीतील इतर विद्यापीठांशी तुलना करता स्टुटगार्ट विद्यापीठ हे उत्पन्नाच्या दृष्टिने याचे मानांकन बरेच वरचे आहे.
विद्यापीठाची दोन मुख्य आवारे आहेत जुने आवार शहराच्या मध्यभागी आहे. या आवारात कला, समाजशास्त्र, भाषा ह्याशी निगडित विभाग आहेत. दुसरे मुख्य आवार फाहिंगेन या उपनगरात असून ते स्टुटगार्टच्या डोंगरमाथ्यावर आहे. या आवारात मुख्यत्वे तांत्रिक व शास्त्रिय विषयांची विभागे आहेत.
विभागे
१. स्थापत्यशास्त्र व शहरनियोजन (१५ उपविभाग)
२. बांधकाम व पर्यावरण आभियांत्रिकि विभाग (१४ उपविभाग)