युनियन बँक ऑफ इंडिया ही एक भारतीय राष्ट्रीयीकृत बँक आहे. या बँकेची स्थापना १९१९ मध्ये झाली. १९६९ साली हिचे राष्ट्रीयीकरण झाले.
मुंबई येथे मुख्यालय असलेल्या या बँकेची ६३.४४% मालकी भारत सरकारकडे आहे. या बँकेकडे १३.४५ अब्ज अमेरिकन डॉलरची मालमत्ता आहे.
या बँकेचे उद्घाटन म. गांधीजींच्या हस्ते ११ नोव्हेंबर १९१९ला झाले.