हा लेख दुसऱ्या महायुद्धातील अमेरिकन विमानवाहू नौका यु.एस.एस. एंटरप्राइझ याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, यु.एस.एस. एंटरप्राइझ.
यु.एस.एस. एंटरप्राइझ (सीव्ही-६) ही अमेरिकेची सहावी विमानवाहू नौका होती. एंटरप्राइझ हे नाव असलेली ही सातवी नौका होती. यॉर्कटाउन प्रकारच्या या नौकेचे जलावतरण इ.स. १९३६मध्ये झाले. दुसऱ्या महायुद्धापूर्वी तयार झालेल्या अमेरिकन नौकांपैकी फक्त तीन मोठ्या नौका युद्धातून वाचल्या. एंटरप्राइझ यातील एक होती तर साराटोगा आणि रेंजर या इतर दोन होत्या.
या नौकेस बिग ई असे टोपणनाव दिले गेले होते.