मॉन्युमेंट हे अमेरिकेच्याकॉलोराडो राज्यातील एल पासो काउंटीमध्ये असलेले गाव आहे. हे गाव रॅम्पार्ट रेंज या डोंगररांगेच्या पायथ्याशी वसलेले आहे. मॉन्युमेंट पामर लेक आणि वूडमूर ही तीन गावे ट्राय-लेक परिसरम्हणूनही ओळखली जातात.हे शहर कॉलोराडो स्प्रिंग्ज महानगर क्षेत्राचा एक भाग आहे. मॉन्युमेंटच्या पश्चिमेला पाइक नॅशनल फॉरेस्ट, दक्षिणेला कॉलोराडो स्प्रिंग्ज आणि युनायटेड स्टेट्स एर फोर्स अकॅडेमी, उत्तरेला बाल्ड माउंटन, ट्रू माउंटन आणि स्प्रूस माउंटन तर पूर्वेला ब्लॅक फॉरेस्ट आहेत. [१] या शहराची सुरुवात १८७२मध्ये रियो ग्रांदे रेल्वेमार्गाचा एक थांबा म्हणून झाली. [२]२०२० च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या १०,३९९ होती, [३]