मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (Mumbai Metropolitan Region Development Authority) (लघुरूप : एमएमआरडीए) ही महाराष्ट्र राज्यातील एक सरकारी संस्था आहे. मुंबई महानगर क्षेत्र याचा पायाभूत सुविधेचा विकास करण्यासाठी जबाबदार आहे.[१]
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणची स्थापना २६ जानेवारी १९७५ रोजी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कायदा अंर्तगत झाली.१९७४ साली महाराष्ट्र सरकार ने या भागातील समन्वय व योजनाबद्ध कार्यक्रम यासाठी संस्था निर्मितीस चालना दिली.
एम एम आर डी ए मध्ये १७ सदस्य आहेत.एकनाथ शिंदे (जे सध्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत) हे शहरी विकास कार्यकारीणीचे अध्यक्ष पदी आहेत.[२]