मिशन रोड मैदान किंवा टिन क्वॉंग रोड रिक्रिएशन मैदान हे मॉंग कॉक, हाँग काँग येथील एक बहुउपयोगी खेळांचे मैदान आहे, जे मुख्यतः क्रिकेट सामन्यांसाठी वापरले जाते. १९७६ साली खुल्या झालेल्या ह्या मैदानावरील पहिला सामना हाँग काँग एकादश आणि क्वीन्सलॅंड कोल्ट संघांदरम्यान खेळवला गेला.[१]
नोव्हेंबर २०१५ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (ICC) ह्या मैदानावर आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळवण्याची संमती असल्याचे जाहीर केले,[२] आणि हे मैदान पूर्व आशिया आणि चीन मधील पहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान ठरले.
२६ जानेवारी २०१६ रोजी, ह्या मैदानावर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना २०१५-१७ आयसीसी विश्व क्रिकेट लीग स्पर्धेमध्ये हाँग काँग आणि स्कॉटलंड संघांदरम्यान खेळवला गेला.[३]. मैदानावर पहिले दोन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने ह्याच दोन संघांदरम्यान खेळवले गेले.[४]
संदर्भ