प्रा. डॉ. मिलिंद सखाराम मालशे हे आय.आय.टी. मुंबईतील बी. टेक. पदवीच्या विद्यार्थ्यांना भाषा विज्ञान या ऐच्छिक विषयाचे अध्यापन करत. साहित्य क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून साहित्य क्षेत्राला त्यांनी दिलेल्या योगदानाने पुढे नेणाऱ्या संशोधन निबंधांचा संग्रह असलेले एक पुस्तक साहित्याच्या अभ्यासकांनी त्यांना अर्पण केले आहे.[१]
शिक्षण
भाषा विज्ञानाशी त्यांचा परिचय १९७५ मध्ये मुंबई विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत झाला. १९७७ ते १९७९ या दोन वर्षात हैदराबादच्या 'सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंग्लिश अँड फॉरेन लॅंग्वेज'मध्ये त्यांनी संशोधन केले.[१]