मिलिंद जोशी

मिलिंद गोविंदराव जोशी (माणकेश्वरकर) हे एक मराठी लेखक आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या परंडा तालुक्यातील माणकेश्वर हे त्यांचे मूळ गाव असून त्यांचे शालेय शिक्षण बार्शीला झाले. पुढे ते बी.ई.(सिव्हिल), एम.टेक. झाले.

पुण्यातल्या भारती विद्यापीठाच्या अभियांत्रिकी काॅलेजात ते प्राध्यापक होते. ते काहीकाळ महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह होते. तेथे काही मतभेद झाल्यावर त्यांनी महाराष्ट्र साहित्य परिषद आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ या दोन्ही संस्थांवरील आपल्या पदाचा २१ एप्रिल २०१३ रोजी राजीनामा दिला; परंतु महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पुन्हा निवडून येऊन २०१६पासून ते कार्याध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.

पुस्तके

  • आपली मुलं घडविताना (व्यक्तिमत्त्वविकास)
  • एका परिसाची कथा (कथासंग्रह)
  • ऐसी कळवळ्याची जाती (व्यक्तिचित्रणे)
  • खेळ (कथासंग्रह)
  • चरित्रं अशी घडतात (बाबासाहेब पुरंदरे ते जगदीश खेबुडकर अशा २५ जणांची व्यक्तिचित्रणे)
  • तमाच्या तळाशी (कथासंग्रह)
  • पानगळ (कथासंग्रह)
  • पाहावे आपणासी आपण (स्वयं-विकास)
  • प्राचार्य (प्रा. शिवाजीराव भोसले यांचे चरित्र)
  • शिक्षणातील आनंदयात्री (अनुभवकथन)
  • संतसाहित्य आणि आजची पिढी (संतसाहित्य)

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!