माहीम येथील मिठाईवाले जोशी बुधाकाका यांनी तयार केल्यामुळे हे नाव देण्यात आले आहे.[२] मुंबईतील प्रसिद्ध खाद्यपदार्थांपैकी ही एक मिठाई आहेस.[३] २०१० मध्ये या मिठाईला भौगोलिक संकेत नोंदणी मिळवण्याचा प्रयत्न झाला होता.
इतिहास
या मिठाईचे मूळ मुंबईजवळीलमाहीमच्या बेटावरील आहे. मोहनलाल मिठाईवाला यांनी ही मिठाई विकायला सुरुवात केली होती.[४] नंतर संपूर्ण मुंबईत ही मिठाई विकली जाऊ लागली आणि नंतर देशाच्या इतर भागांमध्येदेखील माहीम हलवा लोकप्रिय झाला.[५]
मूळ चव सर्वत्र सारखीच राहते परंतु रंग आणि जाडीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बदल असू शकतो.