मार्टी अह्तीसारी (फिनिश: Martti Ahtisaari; २३ जून १९४३[काळ सुसंगतता?], विबोर्ग) हा फिनलंड देशाचा माजी राष्ट्राध्यक्ष आहे. मार्च १९९४ ते मार्च २००० दरम्यान ह्या पदावर राहिलेल्या अह्तीसारीला त्याच्या कोसोव्होमधील संघर्ष शांततेच्या मार्गाने सोडवण्यासाठीच्या अथक प्रयत्नांसाठी २००८ साली नोबेल शांतता पारितोषिक देण्यात आले.