मानसी कणेकर

डॉ. मानसी विलास कणेकर (आधीच्या आरती अनिल हवालदार, पूर्वाश्रमीच्या भारती रामचंद्र मराठे) (१५ डिसेंबर, ****- ऑगस्ट, इ.स. २०१६) या मराठी लेखिका, कवयित्री व गायिका होत्या. कणेकर संजीवनी मराठे यांची मुलगी होत. त्यांचे प्रथम पती अनिल हवालदार हे लेखक होते. द्वितीय पती विलास कणेकर हे ठाणे येथे राहणारे असून नाट्यकर्मी होते

मानसी कणेकर यांचे इंग्रजी, मराठी, संस्कृत आणि उर्दू या भाषांवर प्रभुत्व होते. त्या गझल लिहीत आणि गातही.

मानसी कणेकर यांनी २९व्या वर्षी अनुवादशास्त्रात पीएच.डी. मिळवली होती. लॉर्का या प्रसिद्ध स्पॅनिश नाटककाराची तीन नाटके त्यांनी मराठीत अनुवादित केली होती.

त्यांनी ज्ञानेश्वरांच्या अभंगांचे आशयलेखन केले.

सिम्बोलिझम (प्रतीकशास्त्र) या विषयाचा त्यांचा अभ्यास असून त्यांच्या पुस्तकांतून आध्यात्मिक चित्रकार शिवानंद यांची प्रतीकात्मक चित्रे असत.

पुस्तके

  • अनुभावामृत अनुभावामृतपणे (संत ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभवावरचे भाष्य)
  • चांगुणा (नाटक)
  • ममा (मसाला मानसीचा) - पाकशास्त्रावरील माहितीपूर्ण पुस्तक
  • वाडा भवानी आईचा
  • सप्‍तपुत्तलिका
  • सुनीलतारा (योगशास्त्रातील ज्ञानदेवी तेहतिशी या प्रकरणावरचे अभ्यासपूर्वक लिहिलेले पुस्तक)
  • सौंदर्यलहरी (आदी शंकराचार्यांच्या सौंदर्यलहरी स्तोत्राचा अभ्यास करून श्री यंत्र उपासनेवर लिहिलेले पुस्तक)
  • क्षणतरंग (मूळ हिंदी, लहेरों के राजहंस लेखक - मोहन मोहन)

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!