माधवराव सप्रे

माधवराव सप्रे (१९ जून, १८७१:पथरिया, दमोह जिल्हा, मध्य प्रदेश - २३ एप्रिल, १९२६:रायपूर) हे हिंदी लेखक, विचारवंत, पत्रकार-संपादक, स्वातंत्र्यसेनानी आणि सार्वजनिक कामांसाठीच्या स्वयंसेवकांचे मार्गदर्शक होते. त्यांनी लिहिलेली एक टोकरी भर मिट्टी ही हिंदी भाषेतली पहिली लघुकथा समजली जाते.[ संदर्भ हवा ]

सप्रे यांचे आठवीपर्यंत शिक्षण विलासपूरमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी रायपूरहून ११वी मॅट्रिक, आणि त्यानंतर कलकत्त्याहून बी.ए. केले. लगेचच त्यांना मामलेदार म्हणून नोकरी मिळाली. पण त्याकाळी ब्रिटिशांची नोकरी म्हणजे गुलामगिरी असे समजणारी तरुण पिढी होती. तिला अनुसरून सप्रे यांनी नोकरी सोडली आणि पत्रकारितेचा व्यवसाय केला. त्यावेळी संपूर्ण छत्तीसगड प्रदेशात छापखाने नव्हते. सप्रे यांनी विलासपूर जिल्ह्यातल्या पेंड्रा नावाच्या छोट्या गावातून छत्तीसगढ मित्र नावाचे मासिक १९००पासून प्रकाशित करायला सुरुवात केली. हे मासिक जेमतेम तीन वर्षे चालले. मग सप्रे यांनी लोकमान्य टिळकांच्या मराठीतल्या केसरी वर्तमानपत्राची हिंदी आवृत्ती हिंदी केसरी काढली. दरम्यान ते नागपूरहून हिंदी पुस्तकमाला छापून प्रसिद्ध करू लागले.

हिंदी पुस्तके

  • आत्मविद्या (मराठीतून हिंदीत अनुवादित)
  • एकनाथ चरित्र (मराठीतून हिंदीत अनुवादित)
  • गीता रहस्य (मराठीतून हिंदीत)
  • दत्त भार्गव चरित्र (मराठीतून हिंदीत अनुवादित)
  • दासबोध : (रामदास]]स्वामींच्या मराठी दासबोधाचे हिंदी भाषांतर
  • महाभारत की मीमांसा ('महाभारताचा उपसंहार' या चिंतामण विनायक वैद्य यांनी लिहिलेल्या मराठी पुस्तकाचा हिंदी अनुवाद)
  • श्री राम चरित्र (मराठीतून हिंदीत अनुवादित)

सप्रे संग्रहालय

पुरस्कार व सन्मान

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!