माओ दुन या टोपणनावाने ओळखला जाणारा शेन यान्बिंग ऊर्फ शेन दहोंग (देवनागरी लेखनभेद: माओ तुन/ शन दहोंग/शन यान्बिंग; सोपी चिनी लिपी: 茅盾; पिन्यिन: Mao Dun;) (जुलै ४, १८९६ - मार्च २७, १९८१) हा चिनी कादंबरीकार, पत्रकार, समीक्षक होता. १९४९ ते १९६५ सालांदरम्यान त्याने चीनच्या जनता-प्रजासत्ताकाच्या सांस्कृतिक मंत्रिपदाची जबाबदारीही सांभाळली.