माहाबाहु ब्रह्मपुत्रा रिव्हर हेरिटेज सेंटर हे भारत देशातील आसाम राज्यातील गुवाहाटी गुवाहाटीशहरातब्रह्मपुत्रा नदीकाठी बसविलेले एक सांस्कृतिक आणि सामाजिक केंद्र आहे.[१]
स्वरूप
गुवाहाटीमधील ब्रह्मपुत्रा नदीच्या काठी असलेल्या ब्रिटिश काळातील बंगल्याचे रुपांतर स्थानिक पालिकेने सांस्कृतिक व सामाजिक केंद्रात केलेले आहे.[२] फिरण्यासाठी अंतर्गत रस्त्यांची बांधणी केलेली आहे येथे लहान मुलांसाठी उद्यान व खेळणी आहे.उपहारगृहाची सोय येथे उपलब्ध आहे. येथील तलावाला विद्युत रोषणाई केलेली आहे. या परिसराला नागरिक भेट देतात.
संग्रहालय
येथील ब्रिटिशकालीन बंगल्याचे रुपांतर संग्रहालयात केलेले आहे-
आसाम राज्यातील मासेमारीच्या पारंपरिक व्यवसायाची माहिती देणारे दालन
आसामी पारंपरिक वस्त्रोद्योग दालन
आसामच्या सांगीतिक वाद्यांचे प्रदर्शन
आसाम ईशान्य भारतासंबंधी मांहिती देणाऱ्या विविध पुस्तकांचे ग्रंथालय
माजुली बेटावरील मुखवटा निर्मिती कला प्रदर्शन
ब्रिटिशकालीन बैठकीचे दालन
असा विविध दालनातून आसामी संस्कृती आणि समाजाचे दर्शन येथे घडविले आहे.[३]