मराठी वर्णमाला किंवा मराठी मुळाक्षरे खालीलप्रमाणे आहेत; यात प्रामुख्याने ५० वर्णांचा समावेश होतो.
स्वर
() = शासकीय वर्गीकरणातून वगळण्यात आलेले स्वर
{} = इंग्रजीच्या प्रभावामुळे नंतर समविष्ट करण्यात आलेले स्वर
स्वरादी
व्यंजने
() = स्वरमालेत वेगळी चिन्हे नसलेले स्वर
विशेष संयुक्त व्यंजने
क्ष् (क्+ष्) |
ज्ञ् (द्+न्+य्) (संस्कृतमध्ये ज्+ञ्)
|
(श्र्) (श्+र्) |
(त्र्) (त्+र्)
|
() = शासकीय वर्गीकरणातून वगळण्यात आलेली संयुक्त व्यंजने
मराठी भाषेच्या शास्त्रीय वर्णमालेमध्ये (मूळ १६ स्वर + इंग्रजीच्या संपर्कामुळे आलेले २ आधुनिक स्वर) १८ स्वर + २ स्वरादी (अनुस्वार व विसर्ग) + ४२ व्यंजन (४० मूळ आणि २ संयुक्त) असे एकूण ६२ वर्ण दिले आहेत.[१]
उच्चार
मनुष्य एखाद्या वर्णाचा उच्चार करत असताना त्याच्या फुफ्फुसांतून हवा वर येते. ती हवा मग glottis, larynx वगैरे अवयवांतून जाते आणि शेवटी मुखात येते. येथे नाक, पडजीभ, टाळू, alveolar ridge, दात, ओठ, जीभ अशा वेगवेगळ्या अवयवांची उघडझाप होते व एक उच्चार तयार होतो.
पडजीभ आणि जीभेची मागची बाजू एकत्र आली की वेगळा वर्ण उच्चारला जातो आणि जिभेचे टोक व दात यांचा एकमेकांना स्पर्श झाल्यावर एक वेगळाच वर्ण उच्चारला जातो.
उच्चारासाठी वापरले जाणारे अवयव
- मृदू टाळू (velum)
- कठोर टाळू (durum)
- नाकातील पोकळी (nasal cavity)
- ओठ
- दात
- जिभेचे टोक
- जिभेचा मधला भाग
- जिभेची मागची बाजू, इत्यादी अवयव तर वापरले जातातच.
- पण पडजिभेच्या मागचा भाग (uvula) हा भाग उर्दू भाषेतले काही वर्ण उच्चारण्यासाठी वापरला जातो. जसे- क़, ख़, ग़, ड़, ढ़, फ़, वगैरे. मराठीतही च, छ, ज, झ, ञ, फ आणि ड ही अक्षरे दोन-दोन प्रकारे उच्चारली जातात, पण बहुधा वेगळी दाखवली जात नाहीत. (विनोबा भावे हे दंततालव्य वर्ण अधोबिंदू/नुक़्ता वापरून दर्शवत.)
या सर्व अवयवांना उच्चारक (articulators) असे म्हणतात.
मराठीतल्या डावा या शब्दातला ‘ड’चा उच्चार वाड़ा या शब्दातल्या ‘ड़’ पेक्षा वेगळा आहे. त्यामुळे योग्य लिखाण डावा आणि वाड़ा असे व्हावे. इंग्रजीत वाड़ाचे स्पेलिंग Wāṛā असे होते.
हेसुद्धा पहा
संदर्भ
- ^ मराठी युवकभारती इयत्ता १२ वी