मनोरमा अनंत राईलकर

मनोरमा अनंत राईलकर (जन्म : १९२०; - २१-०६-२०१०) या मराठी नाटकांत काम करणाऱ्या एक अभिनेत्री होत्या. त्या मूळ अलिबागच्या होत्या. इ.स. १९४३मध्ये मनोरमाबाई राईलकरांनी मराठी रंगभूमीवर पदार्पण केले. नाटकाचे दौरे चालू असताना त्यांची अनंत राईलकर यांच्याशी ओळख झाली आणि त्या त्यांच्याशी विवाहबद्ध झाल्या.

कारकीर्द

मनोरमा अनंत राईलकरांची अभिनयाची कारकीर्द किमान वीस वर्षे बहरली होती. या काळात त्यांनी छोटा गंधर्व आणि दामूअण्णा मालवणकर यांच्या नाटकांतून कामे केली. त्या ‘शारदा‘ नाटकात शारदेच्या आईची, बेबंदशाही’मध्ये चंद्रावळीची, ’पुण्यप्रभाव’मध्ये दामिनीची, ’मृच्छकटिक’मध्ये यामिनीची(?) आणि ’संगीत संशयकल्लोळ’ नाटकात रोहिणीची भूमिका करत असत. त्यांची रोहिणीची भूमिका अतिशय गाजली होती.

अंतिम दिवस

मनोरमा राईलकर यांचे म्हातारपण फार हलाखीत गेले. मृत्युसमयी त्या साताऱ्याजवळील महागाव येथील वृद्धाश्रमात होत्या. खूपच आजारी असल्यामुळे मनोरमाबाईंना, सातारच्या क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयात ठेवले होते. त्यांच्या इच्छेप्रमाणे निधनानंतर त्यांचा मृतदेह कऱ्हाडच्या कृष्णा वैद्यकीय महाविद्यालयाला देण्यात आला.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!