मधुकर रामदास जोशी

मधुकर रामदास जोशी हे संत वाङ्मयाचे अभ्यासक, लेखक व नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे निवृत्त प्राध्यापक आहेत. नागपूर विद्यापीठात ते मराठी साहित्याच्या ज्ञानकोशाचे संपादक होते. एक हजार पृष्ठांच्या तुकारामगाथेचे त्यांनी संपादन केले आहे. प्राचीन मराठी संतवाङ्मय आणि मराठी साहित्य हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. पीएच.डी. आणि एम.फिल.चे ते परीक्षक होते. जोशींनी नागपूर, जबलपूर आणि उज्जैन विद्यापीठांच्या मराठी बोर्ड ऑफ स्टडीजवर-अध्ययन मंडळांवर काम केले आहे. नागपूर विद्यापीठाचे ते निवृत्त प्राध्यापक आहेत. अनेक विद्यापीठांमध्ये त्यांना संत साहित्याच्या विषयावर अतिथी प्राध्यापक म्हणून निमंत्रित करण्यात येते.

‘एनसायक्लोपीडिया ऑफ हिंदुइझम’मध्ये मनोहर जोशींचे २००हून अधिक लेख समाविष्ट झाले आहेत. सध्या (२०१९ साली) ते तंजावर येथील ३५०० मराठी हस्तलिखितांवर संशोधन करत आहेत.

मधुकर रामदास जोशी हे संत साहित्य अभ्यासक असूनच्या उज्जैन, जबलपूर व नागपूर येथील अभ्यास मंडळांवरही त्यांनी काम केले आहे. अनेक विद्यापीठांमध्ये त्यांना संत साहित्याचे अतिथी प्राध्यापक म्हणून आमंत्रित करतात. 'एन्‌सायक्लोपीडिया ऑफ हिंदूइझम'मध्ये जोशी यांचे २००हून अधिक लेख प्रकाशित झाले आहेत. सध्या (२०२० साली) मधुकर जोशी हे तंजावर येथील मराठी साहित्यावर संशोधन करीत आहेत.

मधुकर जोशी यांनी लिहिलेली/संपादित केलेली पुस्तके

  • गुलाबराव महाराज समकालीन साहित्य
  • समग्र तुकाराम : संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या संपूर्ण साहित्याचे तुलनात्मक पाठभेदासह समग्र संकलन (२००७)
  • दत्त गुरूचे दोन अवतार
  • नाथसंप्रदाय (१९८० सालापर्यंत चार आवृत्त्या प्रकाशित)
  • श्रीनामदेवचरित्र संशोधन : श्रीज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी (या ग्रंथाच्या १९७४ सालापर्यंत चार आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत.)
  • मनोहर अंबानगरी : श्रीमुकुंदराज स्थलकालनिर्णय (१९७९ सालापर्यंत तीन आवृत्त्या प्रकाशित)
  • समग्र समर्थ रामदास स्वामी साहित्य
  • वाङ्मयीन परंपरा आणि ज्ञानेश्वरकन्या (१९८२ सालापर्यंत ३ आवृत्त्या प्रकाशित)
  • श्री विठ्ठल आणि पंढरपूर
  • सिद्ध परंपरा आणि महाराष्ट्रातील संत : डाॅ. मदन कुलकर्णी सद्‌भावनाग्रंथ (२००२पर्यंत २ आवृत्त्या)
  • ज्ञानेश्वरी संशोधन : पाटणगण परंपरा, एक अध्ययन (१९७३पर्यंत २ आवृत्त्या प्रकाशित)

पुरस्कार

सन्मान

  • डाॅ. मधुकर रा. जोशी हे विदर्भ साहित्य संघाच्या ६७व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष होते. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा येथे १४ व १५ मार्चदरम्यान हे संमेलन होणार होते, पण त्याची तारीख पुढे ढकलली गेली.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!