भागभांडवलात गुंतवणुक करणाऱ्या बचत योजना, Equity-Linked Savings Scheme इक्विटी-लिंक्ड सेव्हिंग स्कीम, ज्याला ई.एल.एस.एस (ELSS) नावाने ओळखले जाते, ती भारत सरकारने प्राप्तिकर दात्यांना भारतीय भांडवल बाजारात नोंद असलेल्या कंपन्यांच्या भागभांडवलात गुंतवणुक करण्याच्या बदल्यात प्राप्तिकरातून सुट देण्यासाठी जाहीर केलेली योजना आहे. या योजनेत म्युच्युअल फंडांच्या माध्यमांद्वारे भागभांडवलात ३ वर्षाची गुंतवणुक केल्यास करदात्यास त्याच्या करयोग्य उत्त्पानातुन सुट मीळते. ही सुट प्राप्तिकर कायदा १९६१ च्या नमुना ८० सी नुसार असते. यातील गुंतवणुकवर मिळणारे परतावे हे शेअर बाजारातील तेजी मंदी वर अवलंबून असतात. ईएलएसएसला एसआयपी (सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) आणि एकरकमी गुंतवणूक पर्यायांचा वापर करून गुंतवणूक करता येते. यात ३ वर्षासाठी गुंतवणुक असते आणि मधे मोडता येत नाही. ‘कलम ८० सी’च्या अंतर्गत जे इतर गुंतवणूक पर्याय आहेत त्यामध्ये ईएलएसएसचा गुंतवणूक कालावधी सर्वात कमी आहे.
या योजने मध्ये गुंतवणूक केल्यास वार्षिक रुपये १,५०,००० पर्यंत उत्पन्नातून वजावट मिळू शकते.[१] ई.एल.एस.एस वर मिळणारा लाभांश हा करमुक्त आहे. तीन वर्षांनंतर ई.एल.एस.एस मधील गुंतवणूक विकली तर त्यावर झालेल्या भांडवली नफ्यावर ही कर भरावा लागत नाही, कारण ई.एल.एस.एसच्या विक्रीवर शेअर उलाढाल कर (एसटीटी) भरलेला असल्यामुळे तो करमुक्त आहे.
संदर्भ