बौद्ध साहित्य संमेलन या नावाची संमेलने अनेक संस्था घेतात. त्या संस्थांपैकी अंबाजोगाईची बौद्ध साहित्य परिषद ही एक संस्था आहे. अनेक संस्था एकाच नावाची संमेलने घेत असल्याने एकाहून अधिक संमेलनांचा समान अनुक्रमांक असू शकतो. आणि त्यामुळे कोणत्याही विशिष्ट संमेलनाचा नक्की अनुक्रमांक सांगता येत नाही.
संमेलने
इ.स. १९६८ साली बेळगावला एक बौद्ध साहित्य संमेलन झाले होते. संमेलनाध्यक्ष रतनलाल सोनग्रा होते. संमेलनाला कोणताही अनुक्रमांक नव्हता.
- ३रे अखिल भारतीय बौद्ध-बहुजन साहित्य संमेलन,कोल्हापूरला २५-२६-२७ एप्रिल २००३ या काळात झाले होते. संमेलनाध्यक्ष डॉ. यशवंत मनोहर हे होते.
- एक बौद्ध साहित्य संमेलन, श्रीगोंदा, जि. अहमदनगर येथे , २६-२७ मार्च २०११ रोजी झाले. संमेलनाध्यक्ष : डॉ. यशवंत मनोहर. संमेलनाचा अनुक्रमांक माहीत नाही.
- सांगली येथे १ले बौद्ध साहित्य संस्कृती संमेलन ५-११-२०११ रोजी झाले. संमेलनाध्यक्ष राजा ढाले होते.
- सांगलीत ऑक्टोबर २०१३मध्ये एक बौद्ध साहित्य संमेलन झाले. अनुक्रमांक?
- बौद्ध साहित्य परिषदेच्या वतीने बीड जिल्ह्यातील केज येथे झालेल्या झालेल्या १ल्या बौद्ध साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. आ.ह. साळुंखे होते.
- बौद्ध साहित्य परिषदेच्या वतीने २रे बौद्ध साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे १० नोव्हेंबर २०१३ रोजी झाले. संमेलनाध्यक्ष डॉ. यशवंत मनोहर हे होते.
- बौद्ध साहित्य परिषदेच्या वतीने ३रे एकदिवसीय बौद्ध साहित्य संमेलन लातूर येथे २३ फेब्रुवारी २०१४ला झाले. संमेलनाध्यक्ष ’सकाळ’ माध्यम समूहाचे संपादक-संचालक उत्तम कांबळे होते.
- नागपूरला ६ व ७ ऑक्टोबर २०१६ या काळात पहिले अखिल भारतीय बौद्ध साहित्य संमेलन झाले. या संमेलनात देश-विदेशातील अनेक तत्त्वचिंतक व अभ्यासक उपस्थित होते.
- भारतीय बौद्ध साहित्य परिषद, बुद्धिस्ट मुव्हमेंट सेंटर व नालंदा बुद्ध विहार, सणसवाडी यांच्या वतीने शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथील नालंदा बुद्ध विहारामध्ये ३१ डिसेंबर २०१७ ते १ जानेवारी २०१८ अशा दोन दिवसांच्या काळात पहिले राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलन झाले. अध्यक्षपदी आनंद देवडेकर तर प्रमुख पाहुणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू भीमराव आंबेडकर होते.
हे सुद्धा पहा