बौद्ध दिनदर्शिका

बौद्ध दिनदर्शिका (Pali: Sāsanā Sakaraj; साचा:Lang-my, साचा:IPA-my; ख्मेर: ពុទ្ធសករាជ ;साचा:भाषा-थाई, आरटीजीएस: phutthasakkarat, साचा:IPA-th; सिंहल: බුද්ධ වර්ෂ या සාසන වර්ෂ (बुद्ध Varsha या Sāsana Varsha)) अथवा बौद्ध कॅलेंडरचा वापर बौद्ध पद्धतीची कालगणना करण्यासाठी केला जातो.

रचना

थायलॅंड आवृत्ती, चांद्र-सौर दिनदर्शिका, बौद्ध कॅलेंडर

बौद्ध शक, इसवी सन आणि थाई शक

बौद्ध शक समतुल्य इसवी सन समतुल्य थाई सौर शक
इसवी सनापूर्वी ५४४–५४३
इसवी सनापूर्वी ५४३–५४२
५४३ इ.स.पू १ ते इ.स. १
५४४ इ.स. १–२ इ.स. १–२
२४८३ इ.स. १९४०–१९४१ इ.स. १९४० (एप्रिल–डिसेंबर)
२४८४ इ.स. १९४१–१९४२ इ.स. १९४१
२५६० इ.स. २०१७–२०१८ इ.स. २०१७

महिना

वद्य पक्ष आणि शुद्ध पक्ष

शालिवाहन शकाची ऐतिहासिक पार्श्वभूमी

शालिवाहन शकाची सुरुवात शक वंशातला सम्राट कनिष्क (कारकीर्द - इ.स. ७८ ते इ.स. १०१)ने त्याच्या राज्याभिषेकापासून म्हणजे इसवी सन ७८पासून केली. आजही शालिवाहन शकाचा आकडा व ग्रेगरियन वर्षाचा आकडा यांत ७८ वर्षाचे अंतर आहे. त्या शकाला शालिवाहन ही नंतर जोडलेली उपाधी आहे. (आधार?) सम्राट कनिष्क बौद्ध राजा होता. त्याच्या साम्राज्याचा विस्तार काश्मीर ते महाराष्ट्र व बिहार ते मध्य आशियापर्यंत होता. त्याच्या काळात चौथी धम्म संगीती जालंधर किंवा काश्मीरला झाली. भगवान बुद्धाची पहिली मूर्तीसुद्धा याच काळात तयार झाली. सम्राटांनी स्वतःची व बुद्धांची प्रतिमा असलेली सोन्याची नाणी तयार केली. सम्राटाने पेशावरला बांधलेला विहार हा ४०० फूट उंच होता. सम्राट कनिष्कामुळे बुद्धाचा धम्म प्रसार मध्य आशियामध्ये व चीनमध्ये झाला. अश्वघोष, वसुमित्र, नागार्जुन सारखे विद्वान व चरकसारखे वैद्य त्याच्या दरबारी होते.[]

दिनदर्शिका आणि बौद्ध संस्कृती

बौद्ध संस्कृतीतील सर्व कार्यक्रम पौर्णिमा, अमावस्या व अष्टमी या तिथ्यांप्रमाणे ठरलेले आहेत. बुद्ध पौर्णिमा, गुरू पौर्णिमा (पंच वर्गीय भिक्षूस धम्म देसना), माघ पौर्णिमा, वर्षावास व धम्मचक्र प्रवर्तन दिन या सर्वांचा संबंध चंद्रावर आधारलेल्या दिनदर्शिकेशी येतो. बौद्ध परंपरेप्रमाणे काही ठळक घटना आणि त्यांचा दिनदर्शिकेशी संबंध पुढे दिला आहे.[]

बौद्ध धर्मातील सण व उत्सव आणि दिनदर्शिकेतील दिवस

१. चैत्र पौर्णिमा (चित्त) : सुजाताचे बुद्धास खीरदान.
२. वैशाख पौर्णिमा (वेसाक्को) : बुद्धांचा जन्म, ३५ व्या वर्षी ज्ञान प्राप्ती व ८० व्या वर्षी महापरिनिर्वाण
३. जेष्ठ पौर्णिमा (जेठ्ठ) : तपुस्स व भल्लुकाची धम्मदीक्षा, संघमित्रामहेंद्र यांनी श्रीलंका येथे बोधिवृक्ष लावला.
४. आषाढ पौर्णिमा (आसाळहो) : राणी महामायाची गर्भधारणा, राजपुत्र सिद्धार्थचे महाभिनिष्क्रमण, सारनाथ येथे धम्मचक्र प्रवर्तन म्हणजेच गुरू पौर्णिमा, वर्षावासाची सुरुवात.
५. श्रावण पौर्णिमा (सावणो) : अंगुलीमालची दीक्षा, भगवान बुद्धांच्या महापरिनिब्बानानंतर पहिली धम्म संगीतीची सुरुवात.
६. भाद्रपद (पोठ्ठपादो) : वर्षावासाच्या कालावधीची सुरुवात.
७. अश्विन (अस्सयुजो) : पौर्णिमेस वर्षावास समाप्ती, या महिन्याच्या दहाव्या दिवशी सम्राट अशोकाची भिक्खू मोग्लीपुत्त तिस्स यांच्याकडून धम्मदीक्षा अर्थात अशोक विजया दशमी, त्या नंतर कित्येक शतकांनी बाबासाहेब आंबेडकर व ५ लाख लोकांची नागपूर येथे धम्मदीक्षा
८. कार्तिक पौर्णिमा (कार्तिको) : आधुनिक मूलगंधकुटी विहार, सारनाथला अनागारिक धम्मपाल यांनी तक्षशिला (पाकिस्तान) येथे प्राप्त झालेल्या बुद्धांच्या पवित्र अस्थी भारतात आणून सुरक्षित ठेवल्या. या अस्थींच्या दर्शनार्थ जगभरातील उपासक पौर्णिमेच्या दिवशी भेट देतात.
९. मार्गशीर्ष पौर्णिमा (मागसीरो) : सिद्धार्थ गौतम यांची बुद्धत्व प्राप्त करण्यापूर्वीची राजा बिंबिसारशी पहिली भेट.
१०. पौष पौर्णिमा (पुस्सो) : राजा बिंबीसारांची धम्मदीक्षा
११. माघ (माघो) पौर्णिमा : बुद्धांची महापरिनिब्बनाची घोषणा, स्थवीर आनंद यांचे परिनिब्बान
१२. फाल्गुन (फग्गुनो) पौर्णिमा : बुद्धत्व प्राप्तीनंतर कपिलवस्तूस पहिली भेट, पुत्र राहुलची धम्मदीक्षा.

हे सुद्धा पहा

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ बौद्ध धर्म के २५०० वर्ष: राहुल सांकृत्यायन
  2. ^ तथागतांच्या धम्मात पौर्णिमांचे महत्त्व : लेखक- रा.प. गायकवाड

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!