नेपाळच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर, त्यातील पर्यटकांना माउंट एव्हरेस्ट दाखविल्यावर ते विमान काठमांडू येथे परतत असतांना हा अपघात झाला. विमान कोटदंडाच्या पर्वतशिखरास धडकले असा प्राथमिक अंदाज आहे.
विमान
बीचक्राफ्ट १९००-डी प्रकारच्या विमानास दोन इंजिने व पंखे असतात व त्याची क्षमता १९ असते. अपघातग्रस्त विमान १३ वर्षे जुने आणि ९एन-एईके या क्रमांकाचे होते.