बीडब्ल्यूएफ सुपर मालिका

बीडब्ल्यूएफ सुपर सिरीज ही १४ डिसेंबर २००६ रोजी उद्घाटन झालेली आणि २००७ साली अंमलबजावणी झालेली,[] आणि विश्व बॅडमिंटन संघाने मान्यता दिलेली एक खास बॅडमिंटन स्पर्धा आहे. सुपर सिरीजच्या एका मोसमात जगभरात १२ स्पर्धा घेतल्या जातात, ज्यामधल्या पाच स्पर्धांना सुपर सिरिज प्रीमियर म्हणून वर्गीकृत केले जाते. २०११ पासून, सुपर सिरीजमध्ये स्पर्धेमध्ये दोन स्तरांचा समावेश करण्यात आला, सुपर सिरिज प्रीमियर आणि सुपर सिरिज. सुपर सिरिज प्रीमियर स्पर्धांमध्ये जास्त क्रमवारी गुण आणि जास्त किमान एकूण बक्षीसाची रक्कम दिली जाते.[] सुपर सिरीज क्रमवारीच्या प्रत्येक प्रकारातील आठ सर्वोत्कृष्ट खेळाडू/जोड्यांना वर्षाच्या शेवटी सुपर सिरीज मास्टर्स अंतिम मालिकेमध्ये खेळण्यासाठी आमंत्रित केले जाते

वैशिष्ट्ये

२०१३ फ्रेंच सुपर सिरीज.

बक्षीसाची रक्कम

सुपर सिरीज स्पर्धेमध्ये एकूण किमान USD$२००,००० इतकी रक्कम बक्षीस म्हणून दिली जाते; आणि सुपर सिरीज प्रीमियम स्पर्धेमध्ये एकूण किमान बक्षीसाची रक्कम USD$३५०,००० इतकी आहे; सुपर सिरीज मास्टर्स फायनल स्पर्धेची किमान एकूण बक्षीस रक्कम आहे USD$५००,०००.[] २०१४ पासून, सुपर सिरीज प्रीमियम स्पर्धेमध्ये कमीत कमी बक्षीसाची रक्कम USD$५००,००० इतकी दिली जाते, ज्यामध्ये २०१७ पर्यंत दरसाल किमान USD$५०,००० इतकी वृद्धी केली जाते. सुपर सिरीज स्पर्धेमध्ये हीच किमान मर्यादा USD$२५०,००० इतकी असून २०१७ पर्यंत त्यामध्ये २०१७ पर्यंत दरवर्षी, USD$२५,०००ची भर पडेल.[]

सुपर सिरीजमध्ये पात्रताफेरी वगळता इतर कोणत्याही फेरीतून स्पर्धक बाहेर पडला तरी बक्षीसाची रक्कम देण्यात येते. २००८ च्या मोसमापासून महिला विजेत्यांनासुद्धा पुरुष विजेत्यांइतकीच रक्कम बक्षीस म्हणून देण्यात येते.[] बक्षीसाची रक्कम खालील सुत्रानुसार वाटण्यात येते:[]

फेरी पुरुष एकेरी महिला एकेरी पुरुष दुहेरी महिला दुहेरी मिश्र दुहेरी
विजेते ७.५% ७.५% ७.९% ७.९% ७.९%
उपविजेते ३.८% ३.८% ३.८% ३.८% ३.८%
उपांत्य फेरी १.४५% १.४५% १.४% १.४% १.४%
उपांत्यपूर्व फेरी ०.६% ०.६% ०.७२५% ०.७२५% ०.७२५%
शेवटचे १६ ०.३५% ०.३५% ०.३७५% ०.३७५% ०.३७५%

विश्व क्रमवारी गुण

खेळाडू किंवा जोडी कोणत्या फेरीमध्ये पोहोचते त्यावरून सुपर सिरीज प्रीमियर आणि सुपर सिरीज स्पर्धेमध्ये खेळाडूंना क्रमवारी गुण दिले जातात. बीडब्ल्यूएफ विश्व चॅंपियनशीप आणि उन्हाळी ऑलिंपिक पाठोपाठ सुपर सिरीज प्रीमियर स्पर्धांसाठी सर्वाधिक गुण दिले जातात. विश्व क्रमवारी आणि सुपर सिरीज क्रमवारीसाठी हे गुण वापरले जातात. सुपर सिरीज स्पर्धेतील गुणांनुसार अव्वल आठ खेळाडूंना सुपर सिरीज मास्टर्स अंतिम स्पर्धेत खेळण्याची संधी दिली जाते.[]

सुपर सिरीज आणि सुपर सिरिज प्रीमियर मध्ये दिले जाणारे गुण खालीलप्रमाणे आहेत.

स्पर्धा सुपर सिरीज प्रीमियर
सुपर सिरीज मास्टर्स
सुपर सिरीज
विजेते ११,००० ९,२००
उपविजेते ९,३५० ७,८००
३/४ ७,७०० ६,४२०
५/८ ६,०५० ५,०४०
९/१६ ४,३२० ३,६००
१७/३२ २,६६० २,२२०
३३/६४ १,०६० ८८०
६५/१२८ ५२० ४३०
१२९/२५६ १७०
२५७/५१२ ८०
५१३/१०२४ ४०

देशानुसार विभागणी

२००७ पासून, स्पर्धेच्या मुख्य ड्रॉवेळी समान देशातील खेळाडूंना वेगळे केले जात नाही. परंतु अव्वल दोन सोडून बाकी खेळाडूंना याआधी होत असल्याप्रमाणे दोन वेगळ्या ड्रॉमध्ये विभागले जात नाही. चीनचा आघाडीचा बॅडमिंटनपटू लिन डॅनने ह्या नवीन नियमांवर टीका केली आहे.[] २०१० नंतर पहिल्या डावामध्ये देशानुसार विभागणी बाबत नियमांमध्ये दुरुस्ती करण्यात आली.[]

सहभाग

स्पर्धा सुरू होण्याच्या किमान पाच आठवडे आधी खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवणे गरजेचे आहे. मुख्य फेरीमध्ये फक्त ३२ खेळाडू/जोड्या खेळू शकतात. त्यापैकी फक्त ८ खेळाडू/जोड्यांना प्रत्येक प्रकारासाठी मानांकने दिली जातात. प्रत्येक प्रकारामध्ये विश्व क्रमवारीतील अव्वल २८ आणि ४ पात्रता निकष पार करून आलेले खेळाडू यांचा समावेश असतो.

सप्टेंबर २००८ च्या आधी, पात्रता फेरीमध्ये ३२ खेळाडू/जोड्या सहभागी होऊ शकत असत. त्यानंतर मात्र फक्त १६ खेळाडू/जोड्यांना सहभागी होण्याची संधी दिली जाते, ज्यामध्ये विश्व क्रमवारीनुसार उच्च स्थानावरील चार खेळाडू/जोड्यांना मानांकन दिले जाते.[१०] पात्रता आणि मुख्य स्पर्धेमधील मोठा ताण टाळण्यासाठी हा बदल केला गेला.[११]

प्रत्येक सुपर सिरीज स्पर्धा पाच दिवसाच्या मुख्य फेरीसहीत सहा दिवसांची खेळवली जाते.[१२]

खेळाडू बांधिलकी नियम

२०११ पासून, विश्व क्रमवारीतील प्रत्येक प्रकारामधून अव्वल १० खेळाडूंनी सुपर सिरीज प्रीमियर स्पर्धा आणि एका कॅलेंडर वर्षात (जानेवारी ते डिसेंबर) किमान चार सुपर सिरीज स्पर्धांमध्ये खेळणे गरजेचे आहे. सुपर सिरीज मास्टर्स अंतिम स्पर्धेसाठी पात्र ठरणाऱ्या खेळाडूंनी त्या स्पर्धेत खेळणे हे त्यांचे कर्तव्य आहे. जे खेळाडू/जोड्या खेळू शकणार नाहीत त्यांना माघार शुल्क आणि दंडाची रक्कम भरावी लागते. वैध वैद्यकीय प्रमाणपत्र किंवा खेळाडू स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शारीरिकदृष्ट्या सज्ज नसल्याचे सिद्ध करणारा मजबूत पुरावा असेल तरच सदर दंडातून सूट देण्याबाबत बीडब्ल्यूएफ विचार करु शकते. निवृत्त किंवा निलंबित खेळाडूंसाठी हा नियम लागू होत नाही.[१३][१४]

पंच

२००७ च्या मोसमामध्ये प्रत्येक स्पर्धा त्यांचे स्थानिक पंच नियुक्त करु शकत होत्या. परंतु स्पर्धेदरम्यान अनेक खेळाडूंनी यासाठी आक्षेप घेतल्यानंतर,[१५] २००८ पासून, सुपर सिरीज स्पर्धांसाठी आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र असलेले आणि अधिकृत असे आठ पंच असणे अनिवार्य करण्यात आले.[१६] सध्याच्या नियमांनुसार किमान सहा पंच यजमान सभासद असोसिएशन व्यतिरिक्त इतर सभासद असोसिएशनचे, किमान चार पंच बीडब्ल्यूएफ आणि दोन क्षेत्रीय प्रमाणपत्र असलेले पंच असणे गरजेचे आहे.[१०]

मालिका

सुपर सिरीज स्पर्धा होत असलेले देश
  सुपर सिरिज प्रीमियर
  सुपर सिरिज
  रद्दबातल

दर तीन वर्षांनी बीएफडब्ल्यू समिती सुपर सिरीज आणि सुपर सिरीज प्रीमियर स्पर्धेच्या यजमान देशांची समिक्षा करते.[१०]

इतिहासात, एकून १३ देशांमध्ये १४ स्पर्धा मोसमात कमीत कमी एकदा तरी घेतल्या गेल्या आहेत. २००७ ते २०१३ पर्यंत चीन हा असा एकच देश आहे ज्यानी एका मोसमात दोन वेळा स्पर्धेचे आयोजन केले आहे. २०१४ पासून, ऑस्ट्रेलियाने सुपर सिरीज स्पर्धा घेण्यास सुरुवात केली आहे.[]

स्पर्धा मोसम
२००७ २००८ २००९ २०१० २०११ २०१२ २०१३ २०१४ २०१५ २०१६ २०१७
ऑल इंग्लंड खुली
ऑस्ट्रेलिया खुली
चीन मास्टर्स
चीन खुली
डेन्मार्क खुली
फ्रेंच खुली
हाँग काँग खुली
भारत खुली
इंडोनेशिया खुली
जपान खुली
कोरिया खुली
मलेशिया खुली
सिंगापुर खुली
स्विस खुली
  सुपर सिरिज
  सुपर सिरिज प्रीमियर

सुपर सिरिज मास्टर्स अंतिम फेरी

सुपर सिरीजच्या सर्व स्पर्धा संपल्यानंतर, प्रत्येक प्रकारातील सुपर सिरीजच्या क्रमवारीनुसार अव्वल आठ खेळाडू/जोड्यांना सुपर सिरीज मास्टर्स अंतिम स्पर्धेमध्ये खेळावे लागते, ज्यामध्ये एका सभासद असोसिएशनकडून कमाल दोन खेळाडू/जोड्या सहभागी होऊ शकतात.[१०] ज्यामध्ये एकूण किमान बक्षीसाची रक्कम USD$५००,००० इतकी दिली जाते.[]

क्रमवारीत दोन किंवा जास्त खेळाडूंमध्ये बरोबरी झाल्यास खालील निकषानुसार खेळाडूंची निवड केली जाते:[१०]

  • सर्वात जास्त सुपर सिरीज स्पर्धांमध्ये सहभागी झालेला खेळाडू;
  • जुलै १ पासून सुपर सिरीज स्पर्धांमध्ये जास्त गुण मिळविलेला खेळाडू.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "बीएफडब्ल्यू कडून सुपर सिरीजची सुरवात". bwfworldSuperSeries.com (इंग्रजी भाषेत). 2014-11-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २३ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ "योनेक्स ऑल इंग्लंड एलिव्हेटेड टू बीडब्ल्यूएफ प्रीमियर सुपर सिरीज इव्हेंट". Badmintonstore.com (इंग्रजी भाषेत). २३ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  3. ^ a b "स्पर्धेचे सामान्य नियम". विश्व बॅडमिंटन संघ (इंग्रजी भाषेत). २३ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  4. ^ a b ज्यू, गेराल्ड. "बीडब्ल्यूएफकडून २०१४-१७ सुपर सिरीजचे यजमानपद आणि इतर बदलांची घोषणा". Badzine.net (इंग्रजी भाषेत). २३ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  5. ^ पॉल, राजेस. "महिला बॅडमिंटनपटू विजेत्यांना पुरुषांइतकेच बक्षीस मिळणार" (इंग्रजी भाषेत). २३ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  6. ^ "सुपर सिरीजच्या बक्षीसाचे वाटप". bwfbadminton.org (इंग्रजी भाषेत). २३ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  7. ^ "विश्व बॅडमिंटन संघ – विश्व क्रमवारी पद्धत". विश्व बॅडमिंटन संघ (इंग्रजी भाषेत). २३ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  8. ^ "नवीन नियमांवरुन चीनच्या लिन डॅनची बीडब्ल्यूएफवर टीका". द स्टार (इंग्रजी भाषेत). २३ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  9. ^ "सुपर सिरीजची नियमावली" (इंग्रजी भाषेत). २३ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  10. ^ a b c d e "सुपर सिरीज नियमावली". विश्व बॅडमिंटन संघ (इंग्रजी भाषेत). २३ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  11. ^ "पात्रता फेरीमध्ये बदल". विश्व बॅडमिंटन संघ (इंग्रजी भाषेत). २३ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  12. ^ "सुपर सिरिझ वेळापत्रक". विश्व बॅडमिंटन संघ (इंग्रजी भाषेत). २३ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  13. ^ "खेळाडू बांधिलकी नियम". विश्व बॅडमिंटन संघ (इंग्रजी भाषेत). २४ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  14. ^ "बीडब्ल्यूएफ: सुपर सिरीज प्रीमियर स्पर्धा अव्वल बॅडमिंटनपटूंसाठी अनिवार्य". द स्टार (इंग्रजी भाषेत). २४ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  15. ^ बूपथी, के.एम. "योग्य न्यायासाठी तटस्थ पंच". न्यूझ स्ट्रेट्स टाइम्स (इंग्रजी भाषेत). २४ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  16. ^ "सुपर सिरीज स्पर्धांसाठी आंतरराष्ट्रीय पंच". विश्व बॅडमिंटन संघ (इंग्रजी भाषेत). २४ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.

बाह्यदुवे

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!