बाल्यावस्था पूर्व संगोपन शिक्षण

बाल्यावस्था पूर्व संगोपन शिक्षण (ईसीई : अर्ली चाईल्डहूड एज्युकेशन) , ( बापूसंशि ; अर्थात नर्सरी प्रशिक्षण ) ही, वय वर्षे आठपर्यंतच्या लहान मुलांच्या (औपचारिक आणि अनौपचारिक) शिक्षणाशी संबंधित असलेली शिक्षण सिद्धांताची शाखा आहे. अर्भक/लहान बाळ शिक्षण हा बाल्यावस्था पूर्व संगोपन शिक्षणाचाच एक उपसंच असून, त्यामध्ये जन्मापासून ते वय वर्षे दोनपर्यंतच्या लहान मुलांच्या शिक्षणाचा समावेश केला जातो.

ही शाखा प्रबोधन काळामध्ये, खासकरून उच्च साक्षरता प्रमाण असणाऱ्या युरोपीय देशांमध्ये शिक्षणाचे एक क्षेत्र म्हणून विकसित पावली. एकोणीसाव्या शतकामध्ये यामध्ये सतत विकास होत होत पाश्चिमात्य जगामध्ये वैश्विक प्राथमिक शिक्षण म्हणून सर्वसामान्यपणे मान्यताप्राप्त झाले. शाळापूर्व अंगणवाडी आणि बालवाडीला स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य आणि संघीय कायदेमंडळ निधी पुरवित असल्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये, बाल्यावस्था पूर्व संगोपन शिक्षण हा सर्वसाधारणपणे जाहीर धोरणाचा मुद्दा बनला आहे. हा मुलाच्या विकासामध्ये अतिशय महत्त्वाचा टप्पा मानला जातो. मुलाच्या सर्वांगीण व्यक्तीमत्व विकासाकडे यामध्ये लक्ष दिले जाते.

इतिहास

बाल्यावस्था पूर्व संगोपन शिक्षणाचा इतिहास म्हणजेच इतिहासकालापासून शून्य ते आठ वर्षे वयाच्या मुलांच्या संगोपन आणि शिक्षणाचा होत असलेला विकास. इसीसीई (बापूसंशि)ला जागतिक व्याप्ती आहे कारण लहान मुलांचे शिक्षण आणि संगोपन हा पूर्वीपासूनच प्रत्येक मानवी समाजाचा अविभाज्य हिस्सा राहिला आहे. या सामाजिक भूमिकेसाठी आवश्यक व्यवस्था या कालपरत्वे बदलत राहिलेल्या आहेत आणि प्रत्येक संस्कृतीमध्ये विभिन्न राहिल्या आहेत. कित्येकदा या व्यवस्थेमध्ये कुटुंब आणि समाज रचनेचे तसेच, स्त्री - पुरूष यांच्या सामाजिक आणि आर्थिक भूमिकांचे प्रतिबिंब दिसते. ऐतिहासिकरीत्या, अशा व्यवस्था या प्रामुख्याने अनौपचारिक होत्या आणि त्यामध्ये कुटुंब, नातेवाईक आणि इतर समाजघटकांचा समावेश होता. एकोणीसाव्या शतकामध्ये युरोपचा बराचसा भाग, उत्तर अमेरिका, ब्राझिल, चीन, भारत, जमैका, आणि मेक्सिको या देशांमध्ये शैक्षणिक उद्दिष्टांसाठी बालवाडी आणि संगोपनासाठी दैनंदिन पाळणाघरे उभारण्यास सुरुवात झाली आणि या व्यवस्थांचे औपचारिकीकरण झाले.

विषय

मुलांच्या आयुष्यातील पहिली दोन वर्षे स्वतःची ओळख होण्यात जातात. बहुतेक मुलांना वयाच्या दुसऱ्या वर्षापासुन स्वतःमधला व दुसऱ्या व्यक्तीमधला फरक समजू लागतो. हा फरक समजणे हा मुलांच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक आहे, ज्यावरून, पालकांकडे मुलांचे पहिले शिक्षक म्हणुन पाहिले जाते व मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये ते एक अविभाज्य घटक असतात. ०-२ या काळात झालेल्या बाल्यावस्था पूर्व संगोपन शिक्षणाचा प्रभाव भविष्यातील शिक्षणावर पडू शकतो. जर त्यांच्या मार्गदर्शकाशी त्यांचे संबंध असेच दृढ राहिले तर योग्य मार्गदर्शनाखाली व त्यांचे जग विस्तारल्यास ते भोवतालच्या परिस्थितीशी ते लवकर जुळवुन घेऊ शकतात.

जे पालक सातत्याने आपल्या मुलांशी संवाद साधतात, त्यांना प्रतिसाद देतात ती मुले लवकर शिकण्याची शक्यता असते. जर अशा प्रकारचा संवाद साधला गेला नाही तर त्याचे चुकीचे परिणाम पालक-मुलांचे संबंधांवर व त्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर होऊ शकतात. पालक वा मुलांचे संगोपन करणारी व्यक्ती काही विशिष्ट पद्धती वापरून असे संबंध निर्माण करू शकतात ज्याचा परिणाम म्हणुन मुले परिस्थितीशी लवकर जुळवुन घेऊ शकतात.

Academic Journal reference - हे मासिक या विषयावर प्रायोगिक संशोधन उपलब्ध करते. शिक्षणाने मुलांचा शैक्षणिक व सामाजिक विकास दोन्ही होतो. त्यांचे जग विस्तारल्यास व त्यांना काही विशिष्ट पद्धतीने शिकवल्यास मुले त्यांच्या आवडीचे विषय लवकर शिकतात. ह्या सुरुवातीच्या संगोपन वर्षात शिकण्याची जी साधने ते वापरतील, त्याचा त्यांना आयुष्यभर फायदा होतो. स्वतःची प्रगती करताना त्यांना स्वतःचे मत मांडण्याचे पुरेसे स्वातंत्र्य दिल्यास मुले त्यांची पूर्ण ऊर्जा/शक्ती वापर करू शकतात.

बालकांच्या विकासाचे विविध सिद्धांत

जीन पिआगे, एरिक एरिक्सन, जॉन ड्युवी आणि ल्युसी स्प्राग मिशेल यांनी मांडलेल्या सिद्धांतावर डेव्हलपमेन्टन इन्टरॅक्शन अ‍ॅप्रोच, म्हणजे विकासाच्या देवाणघेवाणीचा दृष्टीकोन आधारित आहे. स्वतःच शोध घेत शिकण्यावर या दृष्टीकोनाचा भर आहे. जीन जॅक्स रूसो यांचा आग्रह असा आहे की शिक्षकांनी प्रत्येक बालकाची वैयक्तिक आवड शोधून तिचा वापर असा केला पाहिजे की, ते बालक त्याच्या वैयक्तिक आणि व्यक्तिगत विकासासाठी अत्यंत गरजेची असलेली माहिती स्वतःच प्राप्त करून घेईल. बालकांचा विकास खालील पाच महत्त्वाच्या पातळ्यांवर अंतर्भूत आहे:

  1. शारीरिकः ज्या पद्धतीनं बालकाचा जैविक आणि शारीरिक विकास होतो, ज्यात दृष्टीचा आणि क्रिया-प्रतिक्रिया यांचाही समावेश आहे.
  2. सामाजिकः ज्या पद्धतीनं बालक इतरांशी वागतं-बोलतं. कुटुंबीय आणि समाज यांच्याबरोबर वावरताना आपले हक्क काय आहेत आणि जबाबदा-या काय आहेत याचं आकलन बालकांना होतं आणि इतरांना समजून घेणं आणि त्यांच्याबरोबर काम करणं हेही ती शिकतात.
  3. भावनिकः ज्या पद्धतीनं बालक भावनिक पूल तयार करतं आणि आत्मविश्वास बळकट करतं. जेव्हा बालकं इतर लोकांना समजून घेऊ शकतात आणि त्यांच्या भावनांशी समरस होऊ शकतात तेव्हा भावनिक पूलही बांधले जातात.
  4. भाषा: ज्या पद्धतीनं बालकं संवाद साधतात, स्वतःपाशी आणि इतरांसमोर ते आपल्या संवेदना आणि भावना कशा प्रकट करतात. तीन महिन्यांची बालकं वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळ्या पद्धतीनं रडतात. सहा महिन्यांची बालकं त्यांच्याशी जे बोललं जातं ते समजू शकतात आणि त्याची नक्कल करू शकतात. भाषा समजून घेण्यासाठी पहिली तीन वर्ष बालकांचा इतरांशी हे संवाद व्हायला हवा. त्या भाषेतले शब्द काय वेगानं अवगत केले जात आहेत हे भाषेचा विकास मोजताना मोजलं जातं.
  5. मानसिक कौशल्यः ज्या पद्धतीनं एखादं बालक माहितीचं पृथक्करण करतं. मानसिक कौशल्यांमध्ये अडचणी सोडवणं, सर्जनशीलता, कल्पनाशक्ती आणि स्मरणशक्ती यांचा समावेश असतो. त्यांच्या आजूबाजूच्या विश्वाचं आकलन त्यांना कसं होतं आहे याचं ते दृश्य स्वरूप असतं. पिआगे यांचा असा विश्वास होता की संवेदना जागृत होत असतानाचा काळ, संवेदना कार्यरत होण्यापूर्वीचा काळ आणि संवेदना कार्यरत झाल्यानंतरचा काळ या तीन मानसिक अवस्थांच्या विविध टप्प्यांवर असताना बालकांच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये ठळक असे बदल दिसून येतात.

वायगॉट्स्की यांचा सामाजिक-सांस्कृतिक शैक्षणिक सिद्धांत

रशियन समुपदेशक लेव्ह वायगॉट्स्की यांनी सामाजिक-सांस्कृतिक शैक्षणिक सिद्धांत म्हणजेच “सोशिओ-कल्चरल लर्निंग थिअरी” मांडला, ज्याचा भर सामाजिक आणि सांस्कृतिक अनुभवांचा व्यक्तिगत विचारांवर आणि मानसिक विचारसाखळीच्या विकासाच्या होणा-या परिणामांवर होता. वायगॉट्स्की यांचा मुद्दा असा होता, की ज्ञानाचा उगम सामाजिक संदर्भात होत असल्याने, आपल्याला आलेले सामाजिक अनुभव आपल्या विचार करायच्या पद्धतीला आणि विश्वाचे अर्थ उलगडायला एक दिशा देतात. वायगॉट्स्की यांचा काळ सामाजिक कार्यप्रवर्तकांच्या आधीचा असला, तरी तेही कार्यप्रवर्तकच होते असं मानलं जातं. सामाजिक कार्यप्रवर्तकांचा असा ठाम विश्वास आहे की एखाद्या व्यक्तिची वैचारिक क्षमता हे त्याचं विविध सामाजिक गटांमध्ये मिसळण्याचं फलित आहे आणि सामाजिक जीवनापासून शिकण्याची प्रक्रिया अलग करता येऊ शकत नाही.

वायगॉट्स्की यांचं प्रतिपादन असं होतं की आपल्यापेक्षा जास्ती माहिती असलेल्या आपल्याच वयाच्या लोकांमध्ये आणि मोठ्या माणसांमध्ये मिसळून बालकं शिकत असतात. त्यांनी एक “झोनल प्रॉक्झिमल डेव्हलपमेन्ट” (झेडपीडी) या नावाची संकल्पना मांडली आहे ज्यामध्ये एखादी शिकाऊ व्यक्ती मदतीसह काय करू शकते आणि मदतीशिवाय काय करू शकत नाही यांच्यामधला फरक दाखवलेला आहे. वायगॉट्स्की यांच्या म्हणण्यानुसार आज एखाद्या बालकाच्या झोनल प्रॉक्झिमल डेव्हलपमेन्टच्या कक्षेत जे आहे, तीच उद्या त्याच्या विकासाची पातळी असू शकते. या सिद्धांताचा बराच प्रभाव तेव्हाच्या चालू शैक्षणिक पद्धतींवर पडला आणि त्यामुळे झेडपीडीच्या प्रभावाखाली ज्या गोष्टी येतात त्यांवर मोठ्या प्रमाणात लक्ष दिलं जाऊ लागलं. वायगॉट्स्की पुढे म्हणतात की झेडपीडीच्या प्रभावाखाली ज्या गोष्टी येतात त्यांवर विचार करायला बालकांना शिकवायला हवं. झेडपीडीचा असा आग्रह होता, की लहान बालकांना शिकवणा-या शिक्षकांनी एक चौकट आखून घ्यावी जी बालकाच्या शैक्षणिक गरजांनुसार जुळवून घेता येईल. अशी चौकट तयार करण्यासाठी विशेष प्रशिक्षित केलेले शिक्षक, वेगळा अभ्यासक्रम आणि जादाचा शिकण्यासाठीचा वेळ लागेल. वायगॉट्स्की यांचं प्रतिपादन असं होतं, की शिक्षकांनी विद्यार्थ्यांना थेट शिकवण्यापेक्षा, शिक्षणाचं सुलभीकरण करावं. विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम ठरवताना शिक्षकांची विद्यार्थ्यांची गरज आणि रूची यांचा विचार करायला हवा असा त्यांचा दृष्टीकोन होता. प्रत्येक विद्यार्थ्यानं आपल्या वर्गमित्र आणि शिक्षकांबरोबर संवाद साधण्यासाठी सक्रीय सहभागी व्हावं. मानसिक विकलांगांच्या शिक्षणासाठी वायगॉट्स्की यांची “सोशिओ-कल्चरल लर्निंग थिअरी” महत्त्वाची आहे. वायगॉट्स्की यांच्यानुसार “सकारात्मकपणे केलेल्या वेगळ्या विचारामुळे विशेष शिक्षणाची निर्मिती झाली; म्हणजेच की एखाद्या विकलांग विद्यार्थ्याला तो काय करण्यासाठी अक्षम आहे यावरून वेगळं करण्याऐवजी त्याची ताकद कशात आहे हे शोधायला हवं.” योग्य ती चौकट आखल्यामुळे विशेष गरजा असलेल्या बालकांच्या अमूर्त विचारसरणीचा विकास होतो.

पिआगे यांची ’कन्स्ट्रक्टव्हिस्ट थिअरी’

१९७० आणि ८० च्या दशकात पियागे यांच्या कन्स्ट्रक्टिव्हिस्ट थिअरीचा मोठा प्रभाव होता. पिआगे यांची स्वतःची रूची मानसिक विकासाच्या वर्णनात्मक अभ्यासामध्ये असली, तरी ’कन्स्ट्रक्टिव्हिस्ट थिअरी ऑफ लर्निंग’, म्हणजेच शिकण्याच्या कार्यप्रवर्तक सिद्धातांचं पायाभरणीचं बरचसं काम त्यांनी केलं. पिआगे यांचा असा विश्वास होता, की शिकण्याची प्रक्रिया ही मनात सुरू होते: बालकं स्वतःला आलेले अनुभव आणि त्यावर नंतर त्यांचं त्यांनी केलेलं मनन, याच्या आधारावर त्यांचं विश्वाबद्दलचं ज्ञान उभं करतात. ते म्हणत, “तर्कशास्त्र हे जन्मत: येत नसून, ते वेगळं तयार केलेलं आहे. त्यामुळे शिकण्याची पहिली पायरी म्हणजे कारणमीमांसा शोधणे.” पिआगे यांनी आखून दिलेल्या चौकटीनुसार शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नुसतीच माहिती देण्यापेक्षा बालकं कुठून स्वतः ज्ञान मिळवू शकतील याची दिशा दाखवायला हवी. पिआगे यांच्या सिद्धांतानुसार, जेव्हा लहान मुलांना एखादी माहिती पहिल्यांदाच नव्याने समजते, तेव्हा त्यांची तेव्हाची जी समज असते त्यात ती माहिती ते बसवायचा आणि मिसळायचा प्रयत्न करतात. माहिती बसवण्याच्या प्रक्रियेत मनात योजना आणि त्यांचं रूप तयार करणं, ज्यायोगे त्या सत्य परिस्थितीच्या ब-यापैकी जवळ जातील हे टप्पे येतात. मिसळण्याच्या प्रक्रियेत मनात तयार असलेल्या योजनांमध्ये नवीन माहिती बसवण्याचा भाग येतो. या दोन प्रक्रियांच्या आधारावर लहान मुलं त्यांच्या मनातली रूपं आणि सत्य यांचा ताळमेळ कसा बसवायचा हे शिकतात. चुकांमधूनही ती शिकतात. पिआगे यांच्या विचाराचा भर कार्यानुभावावर आधारित शिक्षणावर होता. शाळेत असताना हे अनुभव अधिकाधिक प्रत्यक्ष कार्यानुभावावर आधारित आणि ठोस होत जातात, कारण मुलं चुका करता करता शिकतात. त्यामुळे शोध घेणे, विविध वस्तू हाताळणे आणि नवनवीन वातावरणातले अनुभव घेणे हे बालकांच्या सुरुवातीच्या शिक्षणामधले तीन अतिशय महत्त्वपूर्ण घटक आहेत. आलेल्या अनुभवांवर नंतर केलेलं मनन हेही तितकाच महत्त्वाचं आहे. पियागे यांची मनन करण्याच्या संकल्पनेचा प्रभाव गणिताच्या शिक्षणावर पडला. मनन करताना बालकं त्यांना माहित असलेल्या साध्या सोप्या बांधणीमधून वरच्या स्तरावरचा मानसिक विकास साधू शकतात. त्यामुळे बालकं गणिती बांधणीचा विकास करायला शिकतात, जे केवळ माहिती मिळवणं आणि ती आहे त्या माहितीमध्ये मिसळवणं याच्या ताळमेळातून साध्य होऊ शकत नाही. पिआगे यांच्या सिद्धांतानुसार, भाषा आणि प्रतिकं आधी निर्माण होतात आणि मग त्यानंतर त्यांच्याशी संबंधित मानसिक प्रतिकं तयार होतात. संशोधनातही असं सिद्ध झालेलं आहे की बालकं ज्या विशिष्ट मर्यादेपर्यंत लिखित आकडे आणि प्रत्यक्ष संख्या यांचा विचार करू शकतात त्या मर्यादेपर्यंतच ते मनन करू शकतात. पिआगे यांचं असंही म्हणणं होतं की रुढ पद्धतीनं शिक्षण दिलं नाही, तरी बालकं चार गणिती क्रियांकरता स्वतःची वेगळी पद्धत शोधून काढू शकतात. पिआगे यांच्या सिद्धातांमधून असाही अर्थ काढता येतो की लहान बालकांच्या विविध प्रकल्पांची आखणी आणि बांधणी करण्यासाठी संगणकाचा उपयोग एक खूप चांगलं शैक्षणिक साधन म्हणून करता येऊ शकतो. मॅककॅरिक आणि झियोमिंग यांच्यानुसार संगणकावरचे खेळ या सिद्धांताशी सुसंगत आहेत. पण प्लोमॅन आणि स्टीव्हन यांचा शोध असा होता की शिशूशाळेच्या वर्गात संगणकाचा प्रभाव मर्यादित असतो; त्यांच्या शोधानुसार जेव्हा शिक्षकांनी सांगितल्याप्रमाणे संगणकाचा वापर केला जातो, तेव्हाच त्याचा प्रभाव पडतो. याचा अर्थ असा, की कन्स्ट्रक्टिव्हिस्ट थिअरीनुसार संगणकाच्या यशस्वी वापरासाठी शिशूशाळेच्या शिक्षकांची फार महत्त्वाची भूमिका असते.

कोल्ब यांची एक्स्पेरिएन्शिअल लर्निंग थिअरी

जॉन ड्युवी, कर्ट ल्युविन आणि जोन पिआगे यांच्या प्रभावाखाली मांडलेला डेव्हिड कोल्ब यांचा एक्स्पेरिएन्शिअल लर्निंग, अर्थात अनुभवावर आधारित शिक्षणाचा सिद्धांत असं मांडतो, की शिकण्यासाठी बालकांना अनुभव घेणं आवश्यक आहे. "ज्ञानाची निर्मिती हे अनुभवांवर आधारित असलेल्या बदलांमुळे होते. गोष्टी आत्मसात करणं आणि बदल अनुभवणं या दोन्हींच्या संयोगामुळे ज्ञानाची निर्मिती होते." एक्स्पेरिएन्शिअल लर्निंगचं वैशिष्ट्य असं की बालकांकडे व्यक्तिगत लक्ष दिलं जातं आणि शिकवलं जातं. जसजसं एखादं बालक निरिक्षण करतं आणि शोध घेत राहतं, तसतसे, शिक्षक त्याला सखोल प्रश्न विचारतात. त्यामुळे त्याला आधीपासून असलेली माहिती तो त्याने नव्याने शिकलेल्या माहितीशी जुळवतो. कोल्ब या शिक्षणाच्या साखळीचे चार टप्पे करतातः खरा अनुभव घेणे, मनन करत निरिक्षण करणे, कल्पनांना मूर्त रूप देणे आणि सक्रीय प्रयोग करणे. बालकं नवीन परिस्थितीचं निरिक्षण करतात, त्या परिस्थितीवर विचार करतात, त्या परिस्थितीचा अर्थ उलगडायचा प्रयत्न करतात आणि आपल्या विश्वात त्या अर्थाची चाचणी घेतात.

शाळापूर्व शिक्षणाचे व्यावहारिक परिणाम

मागील काही दशकातील अभ्यास असे सांगतो की, शाळापूर्व शिक्षण हे मुलांची शाळाप्रवेशाची तयारी करून घेण्यासाठी आणि शालेय यश मिळवण्यासाठी निर्णायक आहे. शाळापूर्व शिक्षण मुलांच्या सामाजिक-भावनिक मानसिक प्रश्नांचा धोका कमी करत असून (प्रश्न कमी करत नाही तर प्रश्नांचा धोका कमी करते आहे) त्यांच्यामध्ये स्वयंपूर्णता वाढीस लावते आहे. वेगळ्या शब्दात सांगायचे झाले तर मुलांना तर्कसुसंगत आणि सुयोग्य विचार करण्याची शिकवण देण्याची गरज आहे. मुलांना शिकवताना कुठलाही विषय निषिद्ध समाजला जाऊ नये. त्यांना ते ज्या विश्वात राहतात त्याचे मूलभूत ज्ञान तसेच धर्म, नीती, विज्ञान असे गहन आणि गंभीर विषय शिकवले जावे. तीन महिन्याच्या बाळाची दृश्य परिणामकारकता आणि प्रतिसादात्मकता त्या बाळाच्या वयाच्या चौथ्या वर्षांचा शाब्दिक आणि कामगिरी बुध्यांक दर्शवू शकतात. मुलांच्या जडणघडणीच्या काळात शिक्षण दिले असता शाळापूर्व शिक्षणात पूर्वनिश्चयनाने निम्न व उच्च आर्थिक स्तरातील शैक्षणिक यशातील अंतर मिटवण्याची क्षमता असते. निम्न सामाजिक-आर्थिक स्तरांतील मुले शाळा सुरू करतानाच उच्च सामाजिक आर्थिक स्तरातील मुलांपेक्षा मागे असतात. साधारण वयाच्या तिसऱ्या वर्षापर्यंत उच्च सामाजिक-आर्थिक स्तरातील मुलांचा शब्दसंग्रह हा निम्न सामाजिक-आर्थिक स्तरातील मुलांपेक्षा तीन पटीने जास्त असतो. शाळापूर्व शिक्षणातील सहभागामुळे मुलांचा माध्यमिक शिक्षण पूर्ण करण्याचा दर तसेच त्यांची मानक चाचण्यांमधली कामगिरी उंचावत आहे. त्याचबरोबर मुलांची इयत्ता पुनरावृत्ती आणि विशेष शिक्षण देण्याची गरज असलेल्या मुलांची संख्यासुद्धा कमी होते आहे.

पेरी शाळापूर्व प्रकल्पपेरी शाळापूर्व प्रकल्पचा निकाल जाहीर झाल्यापासून एक व्यापक मत असे झाले आहे की शाळापूर्व शिक्षणाची गुणवत्ता ही निम्न आर्थिक स्तरातील मुलांचा सुधारीत बुध्यांक; त्यांचे परीक्षेतील वाढलेले मूल्यांकन; इयत्ता पुनरावृत्तीतील घट आणि विशेष शिक्षण देण्याच्या गरजेतील घट याचा परस्पर संबंध असतो. बऱ्याच अभ्यासाअंती असे लक्षात आले की, जी मुले शाळापूर्व शिक्षणात सहभागी झाली आहेत त्यांचा बुध्यांक वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत ४ ते ११ गुणांनी वाढतो. Milwaukee Project अभ्यास वृत्तांत तर हे गुण २५ ने वाढल्याचे सांगतो. एवढेच नाही तर ज्या विद्यार्थ्यांनी Abecedarian Project मध्ये सहभाग घेतला आहे त्यांचे पंधराव्या वर्षी वाचन आणि गणितातील गुण जे विध्यार्थी प्रोजेक्टमध्ये सहभागी नाहीत त्यांच्या गुणांपेक्षा पुष्कळ अधिक आहेत असे दिसून येते. याशिवाय Abecedarian प्रोजेक्टच्या ३६% विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात चार वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. जी मुले ह्या प्रोजेक्टमध्ये सहभागी नव्हती त्यातील केवळ १४% मुलांनी महाविद्यालयात चार वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला.

शाळापूर्व शिक्षणाचे सामाजिक फायद्यांशिवाय सामाजिक आर्थिक स्तरांवर व्यक्तिगत परिणाम पण असतात. उदा. Chicago Child parent Centers मध्ये प्रवेश घेतलेली मुले वयाच्या २६ व्या वर्षांपर्यंत मादक पदार्थांच्या आहारी जाण्याची, अटक होण्याची, अथवा food stamps वर राहण्याची शक्यता कमी असते. येथे प्रवेश घेतलेली मुले ही जास्त प्रमाणात माध्यमिक शिक्षण पूर्ण करतात , त्यांचा आरोग्य विमा असतो आणि ती मुले पूर्ण वेळ नोकरी/व्यवसाय करताना आढळतात.

पेरी शाळापूर्व प्रकल्प

पेरी शाळापूर्व प्रकल्पात भाग घेण्यासाठी इप्सीलांटी, मिशिगन येथील अल्प उत्पन्न कुटूंबांमधून, तीन ते चार वर्षे वयाच्या काही मुला-मुलींना निवडले गेले. प्रकल्पात सहभागी मुले त्यांच्या वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत, सहभागी नसलेल्या मुलांपेक्षा पाचपट कमी कायदे मोडणाऱ्या व्यक्ती बनण्याची शक्यता होती. पेरी शाळापूर्व प्रकल्पाच्या अभ्यासात असे आढळले कि अल्प उत्पन्न असणाऱ्या ज्या व्यक्ती चांगल्या शाळापूर्व प्रकल्पामध्ये सहभागी होत्या, त्यांनी त्यांच्या वयाच्या चाळिशीपर्यंत, प्रकल्पात सहभागी न झालेल्या व्यक्तींपेक्षा वार्षिक सरासरी $ ५५०० जास्त कमावले. पेरी शाळापूर्व प्रकल्पाचे एकूण फायदा/खर्च गुणोत्तर १७:१ (४:१ सहभागी व्यक्तींसाठी, १३:१ समाजासाठी) आले. तसेच सहभागी व्यक्तींनी सरासरी जास्त वार्षिक उत्पन्न कमावणे व स्वतःच्या मालकीचे घर घेण्याची जास्त, आणि मदतनिधीवर जगण्याची कमीत कमी शक्यता होती. पेरी शाळापूर्व प्रकल्पाच्या लेखकांनी असे मत मांडले कि शिक्षणक्षेत्रात केलेल्या गुंतवणुकीच्या परताव्यामध्ये विद्यार्थ्यांच्या वाढत्या वयानुसार घट होत जाते. हे निरीक्षण महत्त्वाचे आहे, त्यातून असा संदेश मिळतो की शाळापूर्व प्रकल्पांवर होणारा सार्वजनिक खर्च हा फक्त सामाजिक न्यायासाठी नसून, ही समाजाच्या भवितव्यासाठी केलेली आर्थिक गुंतवणूक आहे. २००८ साली, मायकल एल. अँडरसन यांनी पेरी आणि तत्सम शाळापूर्व प्रकल्पाचा विदा पुन्हा तपासला असता एक गोष्ट लक्षात आली की मुलींना या प्रकल्पांचे भरपूर अल्पकालीन व दीर्घकालीन फायदे मिळाले. पण मुलांना त्यातून महत्त्वाचे दीर्घकालीन फायदे मिळाले नाही.

अडथळे आणि आव्हाने

हिंसा, शोषण आणि बाल कामगार प्रथेमुळे मुलांच्या शिकण्याच्या क्षमतेवर व प्रगतीवर वाईट परिणाम होतो. म्हणूनच हिंसा व शोषणापासून लहान मुलांचे रक्षण करणे हा व्यापक शैक्षणिक आस्थेचा भाग आहे. मुलांच्या सुरक्षाविषयक संकेतांच्या उल्लंघनांचे मापन व देखरेख यांत असलेली आव्हाने व संवेदनशीलता, तसेच योग्य मापदंडांची व्याख्या करणे, माहितीचे संकलन व विश्लेषण करणे यांमध्ये असलेल्या त्रुटींमुळे या क्षेत्रातील उपलब्ध माहितीची व्याप्ती तुटपुंजी आहे. तरी सुद्धा प्रातिनिधिक मापदंड वापरून परिस्थितीचे मूल्यमापन करता येते. उदाहरणार्थ, या संदर्भातल्या आंतरराष्ट्रीय संकेतांना मान्यता देणे, ही त्या देशाची मुलांच्या सुरक्षिततेविषयी बांधिलकी मानता येईल. २०१४ पर्यंत १९४ देशांनी CRC3 आणि १७९ देशांनी १९९९ च्या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या ठराव क्रमांक १८२ला मान्यता दिली आहे. हा ठराव अत्यंत खालच्या दर्जाच्या बाल कामगारी प्रथांचे निराकरण करण्याविषयी आहे. परंतु यातील बरेच ठराव ठोस उपाययोजना करून प्रत्यक्ष राबविणे अद्याप बाकी आहे. जगात ५ ते १४ वयोगटातली अंदाजे १५० दशलक्ष मुले बालकामगार आहेत. पाच वर्षे वयाखालील मुलांच्या मृत्यूचे प्रमाण संघर्षबाधित देशांमध्ये इतर गरीब देशांच्या तुलनेत दुप्पट आहे. उद्योगप्रधान देशांमध्ये दरवर्षी 4% मुलांचे शारीरिक शोषण होते तर 10% मुले दुर्लक्षित आहेत किंवा मानसिकदृष्ट्या शोषित आहेत. विकसित आणि विकसनशील दोन्ही देशांमध्ये गरीब व वंचित लोकांची मुले सर्वात जास्त दुर्लक्षित राहतात. याचा पुरावा म्हणजे पालनपोषण व शैक्षणिक सुविधा निकृष्ट दर्जाच्या असूनही त्यांचे वर्धित मूल्य संपन्न परिस्थितीतील मुलांपेक्षा वंचित मुलांसाठी जास्त असते. हा प्रश्न विकसनशील देशांमध्ये दुर्धर आहेच, पण विकसित देशातही अजूनही चांगल्या प्रतीचे पालनपोषण व शैक्षणिक सुविधा सर्व मुलांना समान उपलब्ध नाहीत. युरोपातील अनेक देशांमध्ये अल्पउत्पन्न गटातील व निर्वासित कुटुंबातील मुलांना चांगल्या प्रतीचे पालनपोषण आणि शिक्षण उपलब्ध नाही

मुलांच्या विकासातील अडथळे व उपाय  : मुलांच्या विकासातील प्रमुख अडथळे हे शारीरिक व मानसिक विकासाशी संबंधित असतात. यात शारीरिक पोशानासंबंधी काही अडथळे असतात तर काही अडथळे हे मुलांवर केल्या जाणाऱ्या सस्कारांशी संबंधित असतात. काही मुलांच्या बाबतीत ( विशेषतः मागास भागात राहणारी मुले , गरीब असणारी मुले ) पोषणाची समस्या जाणवते त्यामुळे त्यांच्या

विकासात अडथळे निर्माण होतात . मुलांच्या मानसिक विकासातील अडथळ्यात मुलांवर केल्या जाणाऱ्या संस्कारांचा समावेश करता येईल .या संस्कारात मुलांवर कुटुंबातील सदस्यांकडून होणारे संस्कार ती ज्या कोणत्या समाजात राहतात त्या समाजाकडून केले जाणारे संस्कार यांचा समावेश करता येईल , यात मुलांवर चुकीच्या पधात्तीने झालेलेया सानास्कारांचा समावेश होतो.

यावरील उपाय : या अडथळ्यांवर मात करण्यासाठी प्रामुख्याने मुलांचे पोषण योग्य होणे गर्जेचे आहे . त्याबरोबरच मुलांच्या योग्य मानसिक विकासासाठी त्यांच्यावर चांगले संस्कार होणे गरजेचे आहे .

टिपण

Neaum,S. (2013). Child development for early year’s students and practitioners. 2nd Edition. London: Sage Publications.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!