बलोच वा बलूच ही पाकिस्तानाच्या नैऋत्येकडील बलोचिस्तान प्रांत व इराणच्या सिस्तान व बलूचेस्तान प्रांत, या भूप्रदेशांत राहणारी एक जमात आहे. हे लोक इराणी भाषाकुळात गणली जाणारी बलोच भाषा बोलतात. बलोच भाषेत प्राचीन अवेस्ताई भाषेच्या खुणा आढळतात[ संदर्भ हवा ]. बलोच लोक टोळ्यांनी राहतात. ते डोंगराळ व वाळवंटी भागांत राहतात व आसपासच्या समुदायांपेक्षा आगळी अस्मिता टिकवून आहेत.
इ.स. २००९ सालच्या अंदाजानुसार बलोच समाजाची लोकसंख्या ९० लाख होती[१][२][३]. यातील सुमारे ६०% लोकसंख्या पाकिस्तानाच्या बलोचिस्तान प्रांतात, तर उर्वरित २५% इराणाच्या सिस्तान व बलूचेस्तान प्रांतात राहतात[४]. पाकिस्तानातील सिंध व पंजाब प्रांतांच्या दक्षिण भागातदेखील बलोच लक्षणीय संख्येने राहतात. अफगाणिस्तान, तुर्कमेनिस्तान, ओमान, बहरीन, कुवैत व आफ्रिकेच्या काही भागांतही त्यांची वस्ती आहे. बलोच जमातीचे लोक अधिकतर सुन्नी इस्लामाचे अनुयायी आहेत. इराणमध्ये शिया समाज बहुसंख्य असल्याने, तेथे यांची वेगळी धार्मिक ओळख आहे.
संदर्भ व नोंदी