बबन कांबळे मराठी संपादक, पत्रकार आणि साहित्यिक होते. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील डावरी गावी शेतमजूर कुटुंबात झाला.
कारकीर्द
कांबळे यांनी शिक्षणानंतर काही काळ कंपनीमध्ये नोकरी केली. त्यानंतर त्यांनी दैनिक नवाकाळ मधून पत्रकारितेला प्रारंभ केला. नवाकाळमध्ये ते अग्रलेख लिहीत असत. हे वृत्तरत्न सम्राट या मुंबईतून प्रकाशित होणाऱ्या दैनिकाचे संपादक होते. दिनांक ८ फेब्रुवारी २०२३ रोजी त्यांचे निधन झाले.[१][२]