फेरप्ले हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे गाव आहे. पार्क काउंटीचे प्रशासकीय केंद्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ६७९ होती. हे गाव साउथ पार्कमध्ये असून याच नावाच्या दूरचित्रवाणी मालिकेमध्ये याचे काल्पनिक चित्रण आहे.[१]
या गावाची स्थापना इ.स. १८५९मध्ये झाली. पाइक्स पीक गोल्ड रशच्या सुरुवातीच्या काळात येथे येणाऱ्या लोकांनी हे गाव वसवले.[२][३] इ.स. १८७२मध्ये याची अधिकृत रचना झाली.[४]
संदर्भ आणि नोंदी