फेमिनिस्ट अँड सायन्स : क्रिटिक्स अँड चेंजिंग परस्पेक्टिव्ह्ज इन इंडिया (पुस्तक)

फेमिनिस्ट अँड सायन्स : क्रिटिक्स अँड चेंजिंग परस्पेक्टिव्ह्ज इन इंडिया

फेमिनिस्ट अँड सायन्स : क्रिटिक्स अँड चेंजिंग परस्पेक्टिव्ह्ज इन इंडिया (खंड १)[] हे एस.कृष्‍णा.[] व जी.चढ्ढा.[] यांनी संपादिलेले व स्त्री प्रकाशनाद्वारे प्रकाशित झालेले पुस्तक आहे.

प्रस्तावना

सदरचे पुस्तक भारताच्या पार्श्वभूमीवर विज्ञान व स्त्री यांच्या संबंधांबाबत भाष्य करत असल्याबे विज्ञान व स्त्रीअभ्यास या दोन्ही ज्ञानशाखांसाठी मोलाचे आहे. या दोन्ही शाखांमधील संबंध फक्त ‘विज्ञानशाखेतील स्त्रिया’[] किंवा ‘विज्ञान व स्त्री’ या पारंपरिक दृष्टिकोनातून न बघता, विज्ञानशाखेत पुरुषकेंद्री पूर्वग्रह निर्माण होण्यामागील तत्त्वज्ञानात्मक पूर्वग्रहांचा खुलासा या पुस्तकात आला आहे. सदर विषयावर भारतात झालेल्या चर्चेचा आढावा घेत, पुस्तकाचे संपादक वैज्ञानिक संस्थांमध्ये ज्ञाननिर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या पद्धती व प्रक्रियेतील बदलांचे समर्थन करतात.

ठळक मुद्दे

विज्ञानाच्या क्षेत्रातील पुरुषकेंद्री पूर्वग्रह

संपादकांच्या मते संस्थामधील घट्ट पाय रोवलेले व सुप्त रीत्या कार्यरत असलेले जात, धर्म, वर्ग, लिंगभाव व भाषेच्या आधारावर असलेली असमानता केवळ वैज्ञानिक पद्धती व प्रक्रियांमुळे पुढे येत नाहीत. या विषयावरील बहुतेक चर्चा व चिकित्सा पाश्चिमात्य देशांमध्ये झालेली दिसते. परंतु सदरच्या चर्चेत भारतीय योगदानाची भर देऊन म्हणजेच वसाहतोत्तर संदर्भ देऊन या पुस्तकाने एक मोलाचे योगदान केलेले दिसते. समाजशास्त्र, मानवता ज्ञानशाखा/ मानव नीतिशास्त्र व नैसर्गिक विज्ञानशाखांमधील विविध तज्‍ज्ञांचे योगदान संकलित करून संपादकाने विज्ञानशाखेच्या झालेल्या चिकित्सेतील विविध मुद्दे तसेच आरोग्य, अध्यापनशास्त्र, उपजीविका व लैंगिकता आदी विविध क्षेत्राबाबत स्त्रीवादी भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच येथे केवळ विज्ञान शाखेबाबत स्त्रीवाद्यांची चिकित्साच मांडलेली नाही तर भारतीय स्त्रीवादी संशोधकांनी विज्ञानशाखेतील सिद्धान्तांचा नव्याने शोध व त्यामध्ये सुधारणा कशा प्रकारे केली हेही विविध लेखांद्वारे अधोरेखित केलेले दिसते.

वैज्ञानिक संस्थेत, जात, धर्म, वर्ग व लिंगभावातील आंतरसंबंध हे व्यवहारात कार्यरत असले तरी ते कशा पद्धतीने वैज्ञानिक संशोधनात अंतर्भूत तटस्थता व वैश्विक मूल्यांच्या आड लपले जातात हे संपादक स्पष्ट करतात. या आधारावर ते विज्ञान क्षेत्रातील ज्ञानमीमांसाशास्त्र व व्यवहाराची चिकित्सक मांडणी करतात. पुस्तकातील पहिल्या ४ प्रकरणांमध्ये संपादक वैज्ञानिक ज्ञाननिर्मितीच्या प्रक्रियेत जात, वर्ग व लिंगभाव यांचे आंतरसंबंधाचे स्वरूप व परिणाम अधोरेखित करत विज्ञान शाखेतील तटस्थता या मूल्याला छेद देतात. तसेच वैज्ञानिक संस्थांमध्ये स्त्रिया व निम्न जातीतील व्यक्तीचा समावेश व प्रगतीत आड येणारे ‘काचेचे छत’ कसे काम करते हेही संपादक दाखवून देतात. पुस्तकातील पहिले प्रकरण एका ऑन-लाईन चर्चेवर आधारित आहे. आभा सूरhttps://wgs.mit.edu/people/abha-sur Archived 2015-10-25 at the Wayback Machine. यांच्या पुस्तकावर, ('Dispersed Radiance : Caste , Gender & Modern Science in India')[] यांच्या पुस्तकात सांगितलेली ही चर्चा मेघनाद शाहच्या जातिव्यवस्थेमधील स्थान (इतर मागासवर्गीय जाती व त्यांचे भौतिकशास्त्र यामधील संबंधांबद्दल) या विषयावर त्यांनी केलेल्या एका संभाषणामुळे सुरू झाली. या चर्चेत 'विज्ञान क्षेत्रातील वैश्विक भाषा' व वैज्ञानिकांचे जातिव्यवस्थेतील स्थान आणि लिंगभावात्मक दृष्टिकोनामधील आंतरसंबंधांबद्दल व्यापक व जिवंत चर्चा, तसेच वैज्ञानिक व समाजशास्त्रज्ञांमधील चर्चा वाढवण्यासंदर्भातले व्यावहारिक मुद्दे विचारात घेतले गेलेले दिसतात. चर्चेत भाग घेतलेल्या काहींनी ही चर्चा वाढवण्यास १कलाकार व डिझायनर दुवा म्हणून काम करू शकतील’ अशी भूमिका मांडलेली दिसते. समाजात प्रचलित असलेले लिंगभावासंबंधी पूर्वग्रह जसे स्त्रीत्व व पुरुषत्वासोबत जोडली जाणारी वैशिष्ट्ये, स्त्रिया भावनिक व पुरुष तर्कसंगत व बुद्धिनिष्ठ असण्याबाबतीतील धारणा व यांचा वैज्ञानिक संस्थांमध्ये प्रचलित 'गुणवत्तेच्या' धारणेशी असलेला संबंध, जयश्री सुब्रमण्यम दाखवून देतात. तसेच हे पूर्वग्रह वैज्ञानिक संस्थांमध्ये, स्त्रिया व निम्न जातीतील व्यक्तींच्या प्रवेशात व प्रगतीत आड येतात हेही त्या दाखवून देतात. सुमी कृष्णा विज्ञानातील ज्ञान निर्मितीच्या भाषेवर टीका करत, विज्ञान क्षेत्रातील पुरुषकेंद्री पूर्वग्रह दाखवून देतात. स्त्रीवादी अभ्यासाच्या मदतीने त्या पटवून देतात की स्त्री व पुरुष या संबंधातील सांस्कृतिक धारणा व समज, या विज्ञानातील भाषेतसुद्धा प्रतिबिंबित होतात. स्त्री-पुरुषांसंबंधित विविध धारणा कशा पद्धतीने ज्ञानशाखेतील संरचनांना आकार देतात हेही त्या मांडतात. शेबिंगरच्या मते, बोटॅनिकल टॅक्सॉनॉमीच्या संरचना घडवताना लिंगभावात्मक धारणांचा वापर करण्यात आला. तसेच बॉटनी क्षेत्रातील साहित्यात, मानवी लैंगिक व्यवहारासाठी वापरण्यात आलेली भाषा वापरण्यात आली. मानसशास्त्रातील संशोधन व व्यवहार हे कशा प्रकारे प्रस्थापित मूल्यांद्वारे प्रभावित होतात, तसेच सामाजिक संदर्भ/संशोधन व व्यवहार करणाऱ्याच्या स्थानापासून अलिप्त असतात हे यू.विंध्या अधोरेखित करतात. तर अनिता घई व रचना जोहरी मानसशास्त्र, अपंगत्व व लिंगभाव यामधील आंतरछेदिता दाखवत व तसेच समकालीन प्रजननतंत्रामधील विहित सुप्रजननशास्त्रातील आदर्श अधोरेखित करत स्त्रीवादी गृहीतकांबाबत पुनर्विचार करण्याची गरज दाखवून देतात.

विज्ञान क्षेत्रातील विविध प्रयोग

विज्ञानाच्या क्षेत्रातील पुरुषकेंद्री पूर्वग्रह दाखवून संपादक थांबत नाहीत तर भारतात याबाबत झालेले विविध तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातील व व्यवहारातील प्रयोग तसेच साहित्य व अध्यापनशास्त्राच्या क्षेत्रातील विविध नवीन कल्पना व प्रयोग संकलित करतात. कांचना महादेवनने वसाहतोत्तर स्त्रीवादी परिपेक्षातून 'समुदाय आधारित ज्ञानमीमांसाशास्त्राची' केलेली मांडणी किंवा अच्युतनच्या लेखाद्वारे आरोग्यावर काम करणाऱ्या स्त्रिया वापरात असलेल्या पर्यायी पद्धती पुढे आणत, संपादक समकालीन भारतात केले जाणारे विविध प्रयोग व पर्यायी तत्त्वज्ञानाशी ओळख आपल्याला करून देतात.

विज्ञानाची पुनष्कल्पना व काल्पनिक लिखाणाचे महत्त्व

संपादकाने विज्ञानाची पुनष्कल्पना (वेगळ्या पद्धतीने विचार) करण्यात काल्पनिक लिखाणाला खूप महत्त्वाचे मानले आहे. त्यांच्या मते विज्ञानातील व्यवहाराला अधिक मुक्तिदायी बनविण्यासाठी मानवी एजन्सी (agency) व स्त्रीवादी कल्पनेतील आदर्श समाज (utopia) एक मोलाचे साधन (tool) म्हणून उपयोगास येऊ शकतात. रोखेया शेखावत हुसेन (सामाजिक सुधारक) यांनी लिहिलेले 'सुलतानाचे स्वप्न' (sultana's dream)[] या लेखात त्या जिथे स्त्रिया सत्तेत आहेत व पुरुष घराच्या चार भिंतीत आहेत असे एक काल्पनिक विश्व रंगवतात. यामुळे होणारे समाजातले बदल व विज्ञानाकडे बघण्याची बदललेली दृष्टी दाखवत याची तुलना ते त्या लिखाणाच्या शंभर वर्षानंतर, INSA[] द्वारा केलेल्या एका अभ्यासासोबत करतात. या अभ्यासाच्या निष्कर्षात असे मांडण्यात आले आहे की विज्ञान क्षेत्रात स्त्रियांची उपस्थिती फायदेशीर आहे कारण त्या वैज्ञानिक संशोधनात सौम्य व अधिक मानवी दृष्टिकोन आणतात. या तुलनेद्वारे संपादक पर्यायी विज्ञानाच्या कल्पनेत साहित्याचे महत्त्व मांडतात. पर्यायी विज्ञानाचे एक भाग म्हणून संपादक अध्यापनशास्त्राकडे आपले लक्ष वेधतात व तरुणांमध्ये जागृती व संवेदनशीलता निर्माण करण्यास त्याचे महत्त्व अधोरेखित करतात व म्हणून भारतातातील अध्यापन क्षेत्रातील विविध प्रयोग आपल्यासमोर आणतात. पुस्तकातील १०व्या व ११व्या धड्यात मीना स्वामिनाथन व टी.के. सुंदरी रविंद्रन आपल्याला व्यावसायिक वैज्ञानिकांमध्ये लिंगभावासंदर्भात जागृती निर्माण करण्यासाठी केलेले यशस्वी व अयशस्वी प्रयोग मांडतात.

थोडक्यात, हे पुस्तक फक्त पर्यायी ज्ञानमीमांसाशास्त्र व तत्त्वज्ञानाची मांडणी न करता, जिथे वैज्ञानिक व सामाजिक हे वेगवेगळे न राहता एक दुसऱ्यात मिसळून जातील अशा व्यवहाराची गरज मांडते.

प्रतिक्रिया व योगदान

हेलेन ई. लोंगिनोच्या मते, हा एक स्वागतार्ह खंड आहे. या खंडातील लेख हे...... विज्ञान व आधुनिकता व त्यांचे परिणाम या विषयावरील आंतरदेशीय (transnational) स्त्रीवादी चर्चेत महत्त्वाचे योगदान आहे.’ मैत्रेयी कृष्णाराज मांडतात की, ‘हा खंड विज्ञानक्षेत्रातील तात्त्विक आधाराच्या मर्यादा उत्तम प्रकारे उघड करतो..’[]

'संदर्भ सूची

  1. ^ संपादक - एस.कृष्णा व जी.चढ्ढा - २०१५. Feminists and Science: Critiques and Changing Perspectives in India (खंड १). कोलकता: स्त्री
  2. ^ "संग्रहित प्रत". 2016-04-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-02-18 रोजी पाहिले.
  3. ^ "संग्रहित प्रत" (PDF). 2017-12-15 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2016-02-18 रोजी पाहिले.
  4. ^ http://www.britannica.com/topic/Women-in-Science-1725191
  5. ^ Sur, A. (2012). Dispersed Radiance : Caste , Gender & Modern Science in India. New Delhi: Navayana Publishers.
  6. ^ "संग्रहित प्रत". 2015-09-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-02-18 रोजी पाहिले.
  7. ^ http://insaindia.org/
  8. ^ ISBN 9789381345078

हे सुद्धा पहा

फेमिनिस्ट परस्पेक्टिव्ह्ज ऑन सोशल रिसर्च (पुस्तक)

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!