फेमिना मिस इंडिया

फेमिना मिस इंडिया (इंग्लिश: Femina Miss India) ही भारत देशात भरवली जाणारी वार्षिक सौंदर्य स्पर्धा आहे. १९५२पासून सुरू झालेली ही स्पर्धा सुरुवातीस मिस इंडिया या नावाने होत. १९६३ सालापासून या स्पर्धेचे आयोजन टाइम्स समूहामधील फेमिना हे मासिक करते. तेव्हापासून या स्पर्धेचे नाव फेमिना मिस इंडिया आहे. ह्या स्पर्धेत एकूण तीन विजेत्या महिला निवडल्या जातात. फेमिना मिस इंडिया वर्ल्ड मिस वर्ल्ड स्पर्धेमध्ये, फेमिना मिस इंडिया अर्थ मिस अर्थ स्पर्धेमध्ये तर फेमिना मिस इंडिया इंटरनॅशनल मिस इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करते. २००५ सालापर्यंत फेमिना मिस इंडियाकडून मिस एशिया पॅसिफिक इंटरनॅशनल तसेच २००९ सालापर्यंत मिस युनिव्हर्स ह्या स्पर्धांसाठी स्पर्धक पाठवल्या जात.

जागतिक विजेतेपदे

स्पर्धा विजेतेपदे विजेत्या व वर्ष
मिस युनिव्हर्स
2
    सुश्मिता सेन (१९९४), लारा दत्ता (२०००)
मिस वर्ल्ड
5
    रीटा फारिया (१९६६), ऐश्वर्या राय (१९९४), डायना हेडन (१९९७), युक्ता मूखी (१९९९), प्रियांका चोप्रा (२०००) मानुषी छिल्लर (2017)
मिस अर्थ
1
    निकोल फारिया (२०१०)
मिस इंटरनॅशनल विजेत्या नाही
मिस एशिया पॅसिफिक इंटरनॅशनल
3
    झीनत अमान (१९७०), तारा ॲना फोन्सेका (१९७३), दिया मिर्झा (२०००)

इतर विजेत्या

खालील बॉलिवूड अभिनेत्रींनी फेमिना मिस इंडिया स्पर्धेत विजय मिळवला आहे.

बाह्य दुवे

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!