प्रिन्स्टन विद्यापीठ

प्रिन्स्टन विद्यापीठ
ब्रीदवाक्य Deī sub nūmine viget (लॅटिन)
Type खाजगी विद्यापीठ
Endowment १८.२ अब्ज अमेरिकन डॉलर
President ड्रू जिल्पिन फ्रॉस्ट
पदवी ५,३३६
स्नातकोत्तर २,६७४
संकेतस्थळ http://www.princeton.edu/



प्रिन्स्टन विद्यापीठ हे अमेरिका देशाच्या न्यू जर्सी राज्यातील प्रिन्स्टन ह्या शहरात स्थित असलेले एक खाजगी विद्यापीठ आहे. इ.स. १७४६ साली स्थापन झालेले प्रिन्स्टन हे अमेरिकेमधील सर्वात जुन्या उच्च शिक्षणासाठीच्या विद्यापीठांपैकी एक आहे. सध्या सुमारे १८ अब्ज डॉलर संपत्ती असलेले प्रिन्स्टन हे जगातील सर्वात श्रीमंत व प्रतिष्ठित विद्यापीठांपैकी एक आहे. आयव्ही लीग ह्या न्यू इंग्लंड परिसरातील प्रतिष्ठेच्या विद्यापीठ समूहाचा प्रिन्स्टन सदस्य आहे.

जेम्स मॅडिसनवूड्रो विल्सन ह्या दोन अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी, अ‍ॅरन बर ह्या उपराष्ट्राध्यक्षाने तसेच मिशेल ओबामा ह्या विद्यमान पहिल्या महिलेले येथून शिक्षण घेतले आहे. आजवर ३७ नोबेल पारितोषिक विजेते प्रिन्स्टनसोबत संलग्न राहिले आहेत.

नोबेल पारितोषिक विजेते

  1. आर्थर कॉम्प्टन[]
  2. क्लिंटन डेव्हिसन[]
  3. फ्रँक विल्चेक[]
  4. जॉन बार्डीन (दोन वेळा नोबेल पारितोषिक विजेता)
  5. रिचर्ड फाइनमन[]
  6. रॉबर्ट हॉफश्टाटर[]
  7. स्टीवन वाईनबर्ग[]
  8. एड्विन मॅकमिलन
  9. रिचर्ड स्मॉली
  10. मायकल स्पेन्स
  11. गॅरी बेकर
  12. जेम्स हेकमन
  13. लॉइड शेप्ली
  14. जॉन फोर्ब्ज नॅश, जुनियर[]
  15. युजीन ओ'नील[]
  16. आर्नो अ‍ॅलन पेन्झियास
  17. डेव्हिड ग्रॉस
  18. जेम्स वॉट्सन क्रोनिन
  19. फिलिप वॉरेन अँडरसन
  20. ओसामू शिमोमुरा
  21. एरिक मॅस्किन
  22. वूड्रो विल्सन
  23. युजीन विग्नर
  24. जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर
  25. रसेल अ‍ॅलन हल्से
  26. व्हाल लॉग्सडन फिच
  27. एरिक वीशाउस
  28. जेम्स रॉथमन
  29. आर्थर लुईस
  30. क्रिस्टोफर सिम्स
  31. डॅनियेल काह्नेमान
  32. पॉल क्रुगमन
  33. थॉमस सार्जंट
  34. जॉन फोर्ब्ज नॅश, जुनियर
  35. मारियो वार्गास योसा
  36. टोनी मॉरिसन
  37. डॅनियेल सी. त्सुइ

संदर्भ

  1. ^ a b c d e f g "Princeton University - Nobel Prize Winners". 2013-12-21 रोजी पाहिले.
  2. ^ "Princeton University PhD Thesis" (PDF).

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!