प्रसार भारती हे ब्रॉकास्टिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या स्वायत्त सार्वजनिक महामंडळाने नियमित वापरासाठी घेतलेलेल ब्रँड नाव आहे. भारतीय संसदेच्या कायद्यानुसार २३ नोव्हेंबर १९९७ रोजी प्रसार भारतीची स्थापना करण्यात आली. त्यापूर्वीपासून माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा भाग म्हणून कार्यरत असलेली दूरदर्शनची आणि आकाशवाणीची (ऑल इंडिया रेडीओ) संपूर्ण नेटवर्क मालमत्ता आणि मनुष्यबळासह प्रसार भारतीकडे हस्तांतरित करण्यात आली.
प्रसारभारती व्यवस्थापन मंडळाच्या चेअरपर्सन म्हणून मृणाल पांडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बी. एस. लल्ली यांच्याकडे सूत्रे आहेत.
बाह्यदुवे
प्रसारभारतीचे संकेतस्थळ [[१]]