१२वे प्रतिभा संगम विद्यार्थी साहित्य संमेलन जळगाव येथे २७ ते २९ सप्टेंबर, इ.स. २०१३ या दिवसांत झाले. हे संमेलन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित करते.. अगदी पहिले प्रतिभा संगम साहित्य संमेलन १९९६ साली अमळनेर येथे झाले होते. त्यानंतर २रे रत्नागिरीला आणि पुढची गोवा, मुंबई, सांगली आदी ठिकाणी ही संमेलने झाली. जळगावमध्ये हे दुसऱ्यांदा झालेले प्रतिभा संगम संमेलन होते.
मधली साहित्य संमेलने पुणे, डोंबिवली, नांदेड, सांगली, औरंगाबाद आणि सोलापूर येथे झाली. १३वे प्रतिभा संगम साहित्य संमेलन १२ ते १४ डिसेंबर २०१४ला ठाण्यात होणार आहे.
पहा : साहित्य संमेलने