प्रकृती (भिक्खुणी)

प्रकृती (पाली-पक्कति) ही गौतम बुद्धांच्या समकालीन एक बौद्ध भिक्खुणी होती. तत्कालीन सामाजिक समजानुसार एका हीन कुळात जन्म घेऊनही गौतम बुद्धांनी तिला संघात प्रवेश दिला होता.

कथानक

प्रकृती यांचा जन्म एका मातंग कुटुंबात झाला होता. एक दिवस बुद्धांचे शिष्य आनंद चारिका करत असतांना तहान लागल्यामुळे एका विहिरीवर गेले. तेथे पाणी भरत असलेल्या प्रकृती यांना त्यांनी पाणी मागितले. प्रकृती यांनी आनंदांना आपल्या चांडाळ असल्याची माहिती देऊन त्यांना आपण पाणी देणे योग्य होणार नाहे असे सांगितले. आनंदांनी आपणास तिच्याकडून तिचे कूल नको असून केवळ पाणी हवे असे आहे असे सांगितले. आनंद यांच्या नम्रतेमुळे प्रभावित होऊन प्रकृती यांनी आनंद यांच्याबरोबर विवाहित होण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु आनंद यांनी आपण श्रमण असल्यामुळे असे करू शकत नसल्याचे सांगितले. अनेक प्रयत्न करूनही आनंद विवाहास तयार होत नाही असे पाहून त्यांनी गौतम बुद्धांकडे आपली तक्रार मांडली. गौतम बुद्धांनी तिला योग्य उपदेश देऊन तिला एका श्रमणासोबत विवाहाच्या विचारापासून परावृत्त केले. त्यावेळी प्रकृती यांनी त्यांना संघात प्रविष्ट करून घ्यावे अशी बुद्धांकडे मागणी केली व बुद्धांनी त्यांना संघात प्रवेश दिला.

संदर्भ

हे सुद्धा पहा

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!