पोप जॉन चौथा

पोप जॉन चौथा (-ऑक्टोबर १२, इ.स. ६४२:रोम) हा सातव्या शतकातील पोप होता.

जॉन डाल्मेशियाचा वतनी होता. याचे वडील व्हेनान्शियस हे वकील होते. रोमन चर्चच्या आर्चडीकनपदी असताना डिसेंबर २४, इ.स. ६४० रोजी जॉनची पोपपदी निवड झाली. पोपपदी राज्याभिषेक होण्याआधीच जॉनने रोमन चर्चच्या इतर सत्ताधाऱ्यांशी संगनमत करून आयरिश धर्मगुरूंना त्यांच्या कालगणनेतील व इतर चुकांबद्दल कानउघाडणी करणारी पत्रे पाठवली. तसेच त्याने ख्रिश्चन धर्मातील अद्वैतवादाचा धिक्कार केला. हे पाहताच रोमन सम्राट हेराक्लियसनेही देखील तसेच मत जाहीर केले.

पोपपदी आल्यावर जॉनने आपले लक्ष स्वतःच्या मातृभूमीतील गडबडीकडे केंद्रित केले. या सुमारास डाल्मेशियावर स्लाव्ह लोकांनी आक्रमण केले होते. डाल्मेशियन लोकांची त्यांच्यापासून सुटका करण्यासाठी जॉनने ऍबट मार्टिनला डाल्मेशिया व इस्ट्रियामध्ये मोठा खजिना घेउन पाठवले. स्लाव्हांनी मोडतोड केलेली चर्च मार्टिनला परत बांधून घेणे अशक्य होते त्यामुळे त्याने डाल्मेशियातील ख्रिश्चन संतांचे अवशेष रोममध्ये आणले. जॉनने हे अवशेष जपण्यासाठी रोममध्ये एक ओरेटरी बांधली, जी आजपर्यंत शाबूत आहे. जॉनने स्लाव्हांपासून ख्रिश्चनांचा बचाव करतानाच त्यांचे धर्मपरिवर्तन करण्याचाही प्रयत्न केला.

मागील:
पोप सेव्हेरिनस
पोप
डिसेंबर २४, इ.स. ६४०ऑक्टोबर १२, इ.स. ६४२
पुढील:
पोप थियोडोर पहिला

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!