पायरट्स ऑफ द कॅरिबियन - कर्स ऑफ द ब्लॅक पर्ल |
---|
दिग्दर्शन |
गोर वेर्बिनस्की |
---|
निर्मिती |
वॉल्ट डिस्ने |
---|
कथा |
टेड इलियॉट |
---|
प्रमुख कलाकार |
जॉनी डेप ओरलॅंडो ब्लूम कीरा नाइटली |
---|
संगीत |
हान्स झिमर |
---|
देश |
अमेरिकेची संयुक्त संस्थाने |
---|
भाषा |
इंग्लिश |
---|
प्रदर्शित |
२००३ |
---|
|
पायरट्स ऑफ द कॅरीबियन - कर्स ऑफ द ब्लॅक पर्ल हा चित्रपट पायरट्स ऑफ द कॅरीबियन चित्रपटशृंखलेचा पहिला भाग असून सन २००३ मध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट काल्पनिक कथानकावर असून प्रसिद्ध चित्रपटनिर्माते वॉल्ट डिस्ने प्रॉडक्शनने बनवला आहे.
चित्रपटाचे कथानक १८ व्या शतकातील असून त्याकाळात अस्तित्वात असलेले पायरट्स ज्यांना मराठीत समुद्री चाचे म्हणतात त्यांच्यावर आधारित आहे. या चित्रपटशृंखलेतील नायक कॅप्टन जॅक स्पॅरो असून तो महाबिलंदर व्यक्तिमत्त्व म्हणून चित्रपटात दाखवला आहे.
हा चित्रपट गोर वेर्बिनस्की यांनी दिग्दर्शित केला असून जॉनी डेप, ओरलॅंडो ब्लूम, कीरा नाइटली यांची प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर चित्रपटशृंखलेतील पुढील भाग डेड मॅन्स चेस्ट व ऍट वर्ल्ड्स एंड हे चित्रपट २००५ व २००७ मध्ये अनुक्रमे प्रदर्शित झाले व त्यांनीही अभूतपूर्व असे यश मिळवले.
कथानक
ब्लॅक पर्ल हे कॅरिबियन समुद्रातील अतिशय कुख्यात समुद्री चाच्यांचे जहाज असते. या जहाजावर एकेकाळी जॅक स्पॅरोची कप्तानी असते परंतु हेक्टर बार्बोसा त्याच्यावर कुरघोडी करून जहाजाचा ताबा घेतो. ऍझटेक सोन्याच्या हव्यासामध्ये बार्बोसा व जहाजावरील इतर कर्मचारी ऍझटेक देवतेची सोन्याची नाणी चोरतात व ऍझटेक देवतेचा भयानक शाप ब्लॅक पर्लवरील सर्व चाच्यांसकट आख्या जहाजाला बसतो व जो पर्यंत ते सर्व सोन्याची नाणी परत देत नाहीत तोवर त्यांचा शाप कायम रहाणार असतो. यातील एक नाणे जहाजावरील चाचा बिल टर्नर आपल्या मुलगा विल्यिमला भेटवस्तू म्हणून पाठवतो. त्यामुळे सर्व नाणी जमा होत नाही व जहाज आणि सर्व चाचे शापाच्या गर्तेत अडकून रहातात.
विलियम टर्नर जेव्हा वडिलांना भेटायला जात असतो त्यावेळेस त्यांचे जहाज चाचे लोकांकडून लुटले जाते परंतु विलियमला ब्रिटिश जहाज वाचवते. जहाजावर असलेले गर्व्हनर स्वान आपल्या मुलगी एलिझाबेथला विलियमची काळाजी घेण्यास सांगतात, त्यावेळेस तिला त्याजवळचे ऍजटेक नाणे सापडते व विलियमला चाचे म्हणून समजतील म्हणून आपल्याजवळच ठेवते.
मोठे झाल्यावर पोर्ट रॉयल येथे विलियम लोहार बनतो . एके दिवशी एलिझाबेथ एका कार्यक्रमा दरम्यान अतितंग कपड्यांमुळे चक्कर येउन समुद्रात पडते व तिचे ऍजटेक नाणेही पाण्यात पडल्याने ब्लॅक पर्लला तिच्याकडे नाणे असल्याचा सुगावा लागतो. यावेळेस तिथे जहाज चोरायला आलेला जॅक स्पॅरो तिला पाण्यातून वाचवतो. परंतु ब्रिटिश सेनेच्या हातात सापडतो. चाचा असल्याने त्याला लागलीच फाशीची शिक्षा सुनावण्यात येते. जॅकचे पळून जाण्याचे प्रयत्न व्यर्थ ठरतात. विलियम त्याला पकडून सैन्याचा हवाली करतो. त्या दिवशी रात्री ब्लॅक पर्ल जहाज पोर्ट रॉयलवर अतिशय जबरदस्त हल्ला करते व एलिझाबेथला तिच्या कडे नाणे असल्याने चाचे तिला पळवून आणतात.
एलिझाबेथला बिल टर्नरची मुलगी आहे असे समजून बार्बोसा तिला ऍजटेक देवतेपाशी शापातून मुक्त होण्यासाठी तिचे रक्त देण्यासाठी तिला घेउन जाण्याचे ठरवतो. इकडे पोर्ट रॉयल मध्ये विलियम जॅकला कैदेतून सोडवतो व एलिझाबेथला परत आणण्यासाठी मदतीचे आश्वासन जॅककडून घेतो. दोघे मिळून ब्रिटिशांचे सर्वात भारी जहाज चोरतात. त्यामुळे ब्रिटिश सैन्याला त्यांचा पाठलाग करण्यात भाग पडते. जॅकला गप्पांदर्म्यान कळते की विलियम हा बिल टर्नरचाच मुलगा आहे. ऍझटेक देवतेच्या गुहेतच एलिझाबेथला वाचवायचा प्लॅन बनवतात.
ऍझटेक देवतेच्या गुहेत जॅक व विल जेव्हा पोहोचलेले असतात त्यावेळेस एलिझाबेथचे रक्ताचा अभिषेक करण्याचा कार्यक्रम चालू असतो. परंतु ती बिल टर्नरची मुलगी नसल्याने तिच्या रक्ताचा काहीच उपयोग होत नाही. शाप निघून जात नाही. विल टर्नर जॅकचे न ऍकता एलिझाबेथला सोडवून डॉन्टलेसवर आणतो व जॅकला बार्बोसाच्या सापळ्यात सोडतो. दगाबाजीने सापडलेला जॅक बार्बोसाला सांगतो की तो त्याला बिल टर्नरच्या मुलाला हवाली करेल. बार्बोसा डॉन्टलेसवर हल्ला चढवतो व डॉन्टलेसला नेस्तनाबूत करून टाकतो व एलिझाबेथ, विल व सर्व चाचे बार्बोसाच्या हातात सापडतात. जॅकची ठरल्याप्रमाणे सुटका होते परंतु त्याला व एलिझाबेथला एका निर्जन बेटावर सोडतात व बार्बोसा विलियमला घेउन ऍझटेक देवतेच्या गुहेकडे प्रयाण करतो
या निर्जन बेटावर पुर्वीही जॅकला असेच सोडलेले असते, व संपूर्ण दर्यावर्दी जगात तो त्या बेटावरून कसा सुटला याच्या कहाण्या प्रसिद्ध झालेल्या असतात. एलिझाबेथ त्याचे रहस्य जाणून घ्यायचा प्रयत्न करते. परंतु जॅक तिला बेटावरील रमचा खजिना दाखवतो. एलिझाबेथ व जॅक दोघेही भरपूर रम पिउन झिंगून जातात. सकाळी उठल्यावर जॅकला लक्षात येते की एलिझाबेथने सर्वच्या सर्व रम जाळून मोठा धूर केला आहे ज्याने ब्रिटिश जहाजे आकर्षित होतात. जॅकला पुन्हा बंदी बनवण्यात येते. एलिझाबेथला विलियमला वाचवायचे असते, जॅक जहाजावरील कॅप्टन जेम्स नॉरिंगटनला ब्लॅक पर्लवरील सर्व चाचे पकडून देण्याचे आश्वासन देतो व त्या बदल्यात सुटकेची आशा करतो.
जॅक गुहेत जाऊन बार्बोसाला सूचित करतो की बाहेर नॉरिंगटन तुमचे अमरत्व संपायची वाट पहात आहे व पहिले ब्रिटिश सेनेला संपवून मगच त्यानी शाप सोडवावा. बार्बोसाला हे पटते परंतु तो चाच्यांना पाण्याखालून आक्रमण करायचा आदेश देतो व जॅकचा प्लान फसतो. चाचे ब्रिटिश जहाजांवर आक्रमण करतात. एलिझाबेथ हळूच पळून जाऊन रिकाम्या ब्लॅक पर्लचा ताबा मिळवते व जॅक पण बार्बोसाशी कुरापत काढून लढाई सुरू करतो. सर्वच ठिकाणी लढाई चालू होते. लढाई टोकावर पोहोचली असताना जॅक राहिलेले नाणे विलीयमकडे फेकतो. विलीयम आपले रक्त देउन चाच्यांना शापमुक्त करतो. त्याचवेळेस जॅक बार्बोसाला गोळी झाडतो व आपली प्रतिद्न्या पूर्ण करतो. चाच्यंना आपला शाप गेल्याचे लक्षात येते व ते ब्रिटिश सेनेपुढे शरण येतात. जॅक स्वता:ला नॉरिंगटनच्या हवाली करतो.
जॅकची माफी मान्य होत नाही त्याची फाशीची सुनावणी चालू असतानाच विलीयम व एलिझाबेथ त्याला पळून जाण्यात मदत करतात. जॅकला एलिझाबेथने पळवलेली ब्लॅकपर्ल मिळते व पुढील साहसास् रवाना होतो. नॉरिंगटन पुन्हा जॅकला पकडण्यास निघतो.
प्रदर्शनानंतर
प्रदर्शनाआगोदर अनेक टीकाकारांच्या मते हा चित्रपट फ्लॉप होणार असे मत होते. त्यापुर्वी अनेक पायरटस संदर्भातील चित्रपट फ्लॉपच झाले होते त्यामुळे असा अंदाज होता. डिस्नेच्या थीम पार्कवर आधारित हा चित्रपट असल्याने विषय किती लोकांच्या गळी पडणार याची शंकाच होती. सेन्सॉर बोर्डाने लहान बालकांना हा चित्रपट नाही त्यामुळे प्रौढांचा वाल्ट डिस्ने चित्रपट हा नविनच प्रकार होता. परंतु चित्रपट निर्मात्यांना चित्रपट चालणार यात शंका नव्हती. आणि तसेच झाले. चित्रपट २००३चा ४था सर्वाधिक कमाई करणार चित्रपट ठरला. या चित्रपटाने एकूण जगभर ६५.४ कोटी डॉलर इतकी कमाई केली आहे.
जॅक स्पॅरोच्या अभिनयाबद्दल जॉनी डेपला अनेक पुरस्कार मिळाले.
भूमिका
बाह्य दुवे
संदर्भ