पर्थ ही ऑस्ट्रेलिया देशाच्या वेस्टर्न ऑस्ट्रेलिया ह्या राज्याची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. पर्थ हे ऑस्ट्रेलियातील चौथे सगळ्यात मोठे शहर आहे. या शहराची स्थापना इ.स. १८२९ मध्ये झाली. ब्रिटिश येथे येण्या आधी येथे वाजूक नुगर नावाची आदिवासी जमात नांदत होती.
वेस्टर्न ऑस्ट्रेलियातील खनिज उद्योगामुळे या शहराची अतिशय वेगाने वाढ होत आहे.
पर्थ मधील क्रिकेटचे मैदान वाका या नावाने ओळखले जाते. या मैदानाची खेळपट्टी जगातील सर्वांत वेगवान खेळपट्टी असल्याचे मानले जाते.