नोकिया आशा २००/२०१ हा नोकिया कंपनीने बनवलेला एक भ्रमणध्वनी (मोबाईल फोन) असून तो २०११ मध्ये प्रकाशित झाला. एक सिम असलेला आशा २०१ व दोन सिम असलेला आशा २०० ह्या दोन्ही फोनमध्ये नोकियाची एस४० ही कार्यप्रणाली वापरली गेली आहे. ह्या फोनवर टचस्क्रीनची सुविधा नसून भौतिक कळफलक देण्यात आला आहे.