नॉर्मन राजवंश तथा हाउस ऑफ नॉर्मंडी (नॉर्मन भाषा: मैझाँ दि नोर्मंडी [ mɛ.zɔ̃ d̪e nɔʁ.mɛnde ]) हा फ्रांसच्या नॉर्मंडी प्रदेशातील डची ऑफ नॉर्मंडीमधून सुरू झालेला वंश होता. याचे सदस्य नॉर्मंडीचे ड्यूक, रुआँचे काउंट आणि नॉर्मन विजयानंतर इंग्लंडचे राजे होते.
साधारण इ.स. ९११पासूनचा इतिहास असलेला हा वंश ११३५ पर्यंत सत्तेवर होता. त्यानंतर त्यांच्यातील एका राजकुमारीचा राजा असलेल्या ब्लवाच्या स्टीवनने सत्ता हिसकावून ब्लवा राजवंशाची सत्ता आणली
नॉर्मन वंश आपला इतिहास वायकिंग राजा रोलो [१] (नॉर्मंडीचा पहिला शासक) आणि बायूची पोप्पा यांच्यापासून सांगतो. विल्यम द कॉन्करर [२] ११३५पर्यंतचे त्याचे वारस या राजवंशाचे सदस्य होते.
त्यानंतर विल्यमची नातवंडे, माटिल्डा आणि तिचा पती जेफ्री [३] तसेच ब्लवाचा स्टीवन यांच्यात यादवी होउन स्टीवनच्या ब्लवा राजवंशाची सत्ता स्थापन झाली.[४]
नॉर्मन वंशातील शासक
रुआँचे काउंट
नॉर्मंडीचे नॉर्मन ड्यूक
इंग्लंड आणि नॉर्मंडीचे नॉर्मन राजे
संदर्भ आणि नोंदी