नेल्सन हे न्यू झीलंड मधील टास्मान बेच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले एक शहर आहे, तसेच ते नेल्सन क्षेत्राचे आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र आहे . १८४१ मध्ये स्थापन झालेले हे न्यू झीलंडमधील दुसरे सर्वात जुने आणि दक्षिण बेटावरील सर्वात जुने स्थायिक शहर आहे आणि रॉयल चार्टरने १८५८ मध्ये हे शहर घोषित केले.