द रेनट्री हॉटेल हे पंचतारांकित हॉटेल भारतातल्या तामिळनाडू राज्यातील चेन्नई शहरात ६३६, अण्णा सलाई, तेयनांपेट येथे आहे.
इतिहास
हे द रेनट्री हॉटेल २७ जुलै २०१० रोजी चालू झाले. ऑगस्ट २०१३ मध्ये समिट हॉटेल्स आणि रिझॉर्ट्समध्ये हे हॉटेल सामील झाले. मुख्यत्वे एशिया पॅसिफिक पोर्टफोलियोप्रमाणे हे हॉटेल संघ-ब्रँड वापरतो. [१]
हॉटेल
या रेनट्री हॉटेलाचा बांधकामाचा खर्च २०० कोटी रुपये आहे[२]. हे कीब्रोस हॉटेल्स यांच्या मालकीचे आहे. ही इमारत १६ मजल्याची व १७० फूट (५२मी.) उंच आहे. या इमारतीचे वास्तुशिल्पकार उफासणी डिझाईन सेल्स असून विकासक सी. सुब्बा रेड्डी आहेत. या हॉटेलच्या खोल्यांतील व इतर अंतर्गत सजावट मलेशियाचे झेलर आणि लीम यांनी केलेला आहे. या हॉटेलमध्ये २३० खोल्या आहेत त्यांपैकी १५५ उच्चतम श्रेणीच्या (deluxe), ८ भारी दराच्या (premium), ५१ संघ खोल्या (club), ५ स्टुडिओ खोल्या, १२ अधिकारी स्वीट्स (executive) व एक अध्यक्षीय स्वीट आहे.[३] रेनट्री हॉटेलात ५ उपाहरगृहे आहेत त्यांत (multi-cuisine), दक्षिण भारतीय आणि अन्यप्रकारचे रुचकर खाद्ये मिळण्याची व्यवस्था आहे. मॉडेरा हा, आरामदायी कोचावर पहुडण्याचा बार, उत्तरीभारतीय आहार, गच्चीवरील उपहारगृह आणि आणखे एक भव्य बारची व्यवस्था आहे. येथे ३ मेजवानी हॉल आहेत. रेनट्री हॉटेलात १२००० चौ.फूट क्षेत्रफळाची ३ सभागृहे आहेत. हॉटेलच्या गच्चीवर पाण्याचा हौद, व्यायाम क्लब, आणि स्पा आहेत. २०० वाहनांची पार्किंग व्यवस्था आहे.[४]
सुविधा
हे हॉटेल सचिव सेवा, प्रवाशी मदतनीस, टपाल व पार्सल सेवा, फिटनेस केंद्र, विनंतीनुसार पाळणाघर या सुविधा पुरविते.
खानपान सुविधा
या हॉटेलचे स्वयंपाक घरातून विविध प्रकारचे देशी, विदेशी, स्थानिक, पदार्थ स्वादिष्ट, रुचकर मिळतात. अप नॉर्थ उपहारगृहात खास करून फक्त पंजाबी खाणे मिळते..
हेड ऑफ मद्रास मध्ये तमिळनाडू, कर्नाटक, गोवा, या राज्यातील खाणे असते. पण परिस्थितीनुसार विशिष्ट प्रकारच्या कोस्टल आहाराचाही समावेश असतो.
मॉडेरामध्ये सकाळी मिळणारी देशी व आंतरराष्ट्रीय लिकर तुमची तहान भागविते.
खोल्यांची सुविधा
सर्व खोल्यातून दूरध्वनी, इस्त्री, रेफ्रिजरेटर, एलेव्हेटर, वातानुकूलित यंत्र, वायफाय, इंटरनेट, या सुविधा आहेत.
बाहेरील सेवेत २४ तास स्वागत कक्ष, पाळणा घर, धोबी, चलन बदलणे, पार्किंग, प्रवाशी कक्ष, हमाल, भाडोत्री वाहने, ब्यूटी सलून, निरोप केंद्र, पोहण्याचा तलाव, खरेदी, सभा व्यवस्था, व्यवसाय केंद्र, ई.सेवा मिळतात.