द मेकिंग ऑफ नियोलिबरल इंडिया (पुस्तक)

द मेकिंग ऑफ नियोलिबरल इंडिया: नॅशनलिझम, जेंडर अंड द पॅराडॉक्सेस ऑफ ग्लोबलायझेशन[] हे पुस्तक अभ्यासक रुपल ओझा[] यांचे आहे. कालि फॉर विमेन याच्याशी संबंधित विमेन अनलिमिटेड ने हे पुस्तक २००६ला प्रकाशित केले आहे.

नव्वदीची पार्श्वभूमी

नवउदारमतवादी भारताची निर्मिती मध्ये ९० च्या दशकावर आणि जागतिकीकरणामधले भारताचे असणारे स्थान यांच्या वादावर भर दिला आहे. एकाचवेळी आलेल्या पण वेगवेगळ्या असलेल्या ३ समस्यांच्या संदर्भात लेखक या वादाकडे बघतो.

  1. १९९१ मध्ये झालेल्या नवउदारमतवादाच्या धोरणातील सुधारणा
  2. हिंदू राष्ट्रवादाचा उगम
  3. सर्व मध्यम वर्गाची एकत्रित ओळख आणि त्यांच्या सत्तेचा उदय.[]

लेखक या वादाचे तीन स्थानांवरून परीक्षणं करतात:

  • उपग्रह आणि केबल टेलिव्हिजनच्या विरोधात असलेल्या तीन केसेस
  • १९९६ला झालेली भव्यदिव्य मिस वर्ल्ड स्पर्धा
  • भारताने १९९८ मध्ये स्वतः कडे अण्वस्त्र असल्याचे घोषणा करणे.

नवीन भारतीय स्त्री आणि तिची व्यक्तीनिष्ठता हे मुद्दे ही येथे चर्चिले आहेत.

महत्त्वाचे मुद्दे

पुस्तकामधला मध्यवर्ती युक्तिवाद सारांशरूपाने खालिलप्रमाणे आहे. सर्व प्रथम भारत देश जस जसा जागतिक होत जाईल, तसे राष्ट्र राज्य हे राज्याच्या संस्कृती व ओळखीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करेल. यामुळे लिंगभाव आणि नैतिकता यांचा ताठर असा चेहरा समोर येईल दुसरे म्हणजे जागतिक भांडवल हे देशाच्या सीमा पार करेल त्यामुळे राष्ट्र राज्याची सत्ता कमी होईल. त्यामुळे राष्ट्राच्या स्वायतत्तेचा झालेला तोटा भरून काढण्यासाठी पश्चिमात्यांपेक्षा आमची संस्कृती रुजविण्याचा प्रयन्त करील. शेवटी जागतिक आणि स्थानिक हे बंद कप्पे (water tight )नाहीत उलट ते परस्पर विरोधी आणि पूरक असे अवकाश आहेत हे मांडलेले आहे.[]

सारांश

प्रकरण १ मध्ये ९० च्या दशकातली जागतिकीकरण व राष्ट्रराज्य यांची प्रत्यक्ष आमने- सामने करण्याविषयीच्या तपशीलाची रूपरेषा आहे.

प्रकरण २ मध्ये नवीन भारतीय स्त्रीचा झालेला उगम व तिला गृहीत असलेल्या विविध भूमिका समजण्यासाठी, महिलांसाठी असणारी मासिके व जाहीरातीच्या अभ्यासाचे समीक्षण केले आहे.

प्रकरण ३ मध्ये कोर्टातील तीन याचीकांविषयी वर्णन आहे. त्या उपग्रह व केबल टीव्ही कंपन्यांच्या विरोधात असून महिलांच्या विविध गटांनी व राष्ट्रीय महिला आयोग यांनी दाखला केल्या होत्या. ह्या केसेस लैगिकता,विभस्तता आणि संस्कृती याविषयी सगळीकडेच वाटणा-या काळजीचे प्रतिनिधित्व आहे.

प्रकरण ४ मध्ये १९९६ मध्ये दिमाखात भरवलेल्या विश्वसुंदरी स्पर्धेवर भर दिला आहे. ही स्पर्धा म्हणजे भारताची आणि भारतीयत्वाची प्रदर्शनीय जागा ठरली. याशिवाय राष्ट्रीयत्व, लिंगभाव, राष्ट्र, लैंगिकता वं ती प्रदर्शित करण्याचे ठिकाण याविषयी चिंता करण्याची जागा ठरली.

प्रकरण ५ मध्ये भारतातील अणुचाचणीवरील चर्चाविश्वात क्षमतेची, बळाची व पौरुषत्वाच्या पुरुषी मांडणीद्वारे कशा पद्धतीने राष्ट्राने स्वतःचे सार्वभौमत्व ठामपणे अधोरेखित केले याचा उलगडा लेखिका करतात.

प्रकरण ६ हे समारोपाचे असून यामध्ये पुस्तकातले युक्तिवाद एकत्र आणलेले आहेत. यामध्ये विशेष करून लिंगभावावरील स्थानिक अथवा जागतिक चर्चाविश्वाबाबत पुनर्विचार करण्यास वाचकांना उद्युक्त केले आहे.

संदर्भ सूची

  1. ^ Oza, Rupal (2006). The Making of Neoliberal India: Nationalism, Gender, and the Paradoxes of Globalization (इंग्रजी भाषेत). Taylor & Francis. ISBN 9780415951869.
  2. ^ "Rupal Oza". www.gc.cuny.edu. 2018-04-06 रोजी पाहिले.
  3. ^ Lokaneeta, Jinee (2008). Sinha, Mrinalini; Oza, Rupal (eds.). "Book Review". Signs. 33 (4): 1000–1003. doi:10.1086/528807.
  4. ^ Pushkar (2014/09). "The Making of Neoliberal India: Nationalism, Gender, and the Paradoxes of Globalization Rupal Oza New York: Routledge, 2012, pp. 176". Canadian Journal of Political Science/Revue canadienne de science politique (इंग्रजी भाषेत). 47 (3): 641–643. doi:10.1017/S0008423914000729. ISSN 0008-4239. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!