लोढा पार्क हा १८.५ एकरचा आरामदायी निवासी गगनचुंबी इमारत प्रकल्प आहे. ही इमारत लोढा ग्रुपनेमुंबईच्या लोअर परेल परिसरात विकसित केली आहे. या प्रकल्पासाठी लागणारी जमीन २०१२ मध्ये DLF लिमिटेडकडून अंदाजे २,८०० कोटी किमतीमध्ये खरेदी करण्यात आली होती. लोढा पार्कमध्ये ५ टॉवर आहेत, त्यापैकी प्रत्येक २६८ मीटर उंचीवर आहे आणि ते ७६ मजली आहेत. [३][४]
२०१९-२० मध्ये लोढा द पार्क टॉवर्स या भारतातील सर्वात उंच इमारती होत्या. त्यानंतर २०२० मध्ये त्यांना वर्ल्ड वनने मागे टाकले होते, जिला पुन्हा २०२३ मध्ये लोखंडवाला मिनर्व्हाने मागे टाकले. [५]