द टेस्टामेंट्स ही मार्गारेट अॅटवुडची २०१९ मधील कादंबरी आहे. ही कादंबरी द हॅंडमेडस् टेल (१९८५)चा उत्तरार्ध आहे. [२] या कादंबरीच्या घटना द हॅन्डमेड टेलच्या घटनेनंतर पंधरा वर्षांनंतर घडतात. ही कादंबरी आंटी लिडिया, ॲगनेस आणि डेझी या कथन करतात. आंटी लिडिया ही मागील कादंबरीतील पात्र आहे. एगनेस ही एक गिलादमध्ये राहणारी तरुण स्त्री आहे आणि डेझी ही कॅनडामध्ये राहणारी एक युवती आहे.[३]