द ओबेरॉय ग्रुप ही एक हॉटेल कंपनी आहे जिचे मुख्यालय दिल्ली येथे आहे.[१] या कंपनीची स्थापना १९३४मध्ये झाली असून, कंपनीचे व इतर असे मिळून ३० पेक्षा जास्त अलिशान हॉटेल्स आणि दोन क्रुझ शिप ६ देशांमध्ये ओबेरॉय हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स आणि ट्रायडेन्ट हॉटेल्सच्या नावाखाली चालवली जातात.
इतिहास
ओबेरॉय ग्रुपची पाळेमुळे १९३४ पर्यंत जातात जेव्हा ग्रुपचे संस्थापक रायबहादूर मोहनसिंग ओबेरॉय यांनी २ मालमत्ता विकत घेतल्या: द क्लार्क्स, दिल्ली आणि द क्लार्क्स, शिमला. पुढील काही वर्षात श्री ओबेरॉय यांना त्यांची दोन मुले येऊन मिळाली, तिलकराज सिंग ओबेरॉय व पृथ्वीराज सिंग ओबेरॉय, आणि त्यांनी भारतात तसेच परदेशात अजून काही मालमत्ता घेऊन ग्रुपचा विस्तार केला.[२]
नोव्हेंबर २००८चा आतंकवादी हल्ला
२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईमधील २ हॉटेल्स द ओबेरॉय, मुंबई आणि, नरीमन पॉईंट, २००८ च्या मुंबईमधील आतंकवादी हल्ल्यांचा एक भाग म्हणून ताब्यात घेण्यात आले होते. सुमारे ३२ कर्मचारी तसेच पाहुणे या ३ दिवसांच्या हल्ल्यात मरण पावले होते.[३]
मालकी हक्क
द ओबेरॉय ग्रुपच्या इआयएच लि. आणि इआयएच असोशिएटेड हॉटेल्स या दोन मोठ्या भागीदार कंपन्या आहेत. पृथ्वीराज सिंग हे ओबेरॉय ग्रुपचे सध्याचे चेरमन आहेत. त्यांचा मुलगा विक्रम ओबेरॉय आणि पुतण्या अर्जुन ओबेरॉय हे भागीदार कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालकपद सांभाळतात.
ओबेरॉय परिवार हा इआयएच लि.चा ३२.११% सह सगळ्यात मोठा हिस्सेदार आहे. आयटीसी लि. कडे इआयएच लि.चे सुमारे १४.९८% समभाग आहेत. आयटीसी लि.च्या दबावांना तोंड देण्यासाठी, ज्यांची मालकी जवळपास 15% पर्यंत होती, ओबेरॉय परिवाराने मुकेश अंबानींच्या रिलायंस इंडस्ट्रीजला इआयएच लि.ला १४.१२% समभाग विकले. हा व्यवहार ३० ऑगस्ट २०१० रोजी इआयएच लि.ची बाजार किंमत ७,२०० करोड गृहीत धरून सुमारे १,०२१ करोड रुपयांत करण्यात आला. नजीकच्या काळात रिलायंसने आयटीसी कडून अजून समभाग विकत घेतले ज्यामुळे त्यांची हिस्सेदारी आता २०% पर्यंत झाली आहे.
हॉटेल्स
कंपनी सध्या ओबेरॉय हॉटेल्स अँड रिसॉर्ट्सच्या नावाखाली अलिशान हॉटेल्स चालवते तसेच ट्रायडेन्ट हॉटेल्सच्या नावाखाली १० पंचतारांकित हॉटेल्स चालविते.[४] तसेच ग्रुप द क्लार्क्स, शिमला आणि द मेडन्स, दिल्ली हे दोन हॉटेल्स सुद्धा चालविते. पण या दोन मालमत्ता ट्रायडेन्ट किंवा ओबेरॉय यांच्या अधिकारात नाही चालवली जात.[५]