या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो.
त्यागराज खाडिलकर (जन्मदिनांक ११ जून १९६७- हयात) हे मराठी, हिंदीतील प्रसिद्ध गायक व संगीतकार आहेत.
ओळख
त्यागराज खाडीलकरांचा जन्म कोल्हापुरमध्ये झाला. त्यांनी आपले शाळेय शिक्षण कोल्हापुरमध्येच पूर्ण केले व पुढील शिक्षण पुणे येथे झाले.
जीवन
त्यागराज यांची आई श्रीमती मंजुश्री खाडीलकर या ख्यातनाम किर्तनकार, त्यांनी ’किर्तन मंदाकिनी’ ही पदवी मिळविली. त्यांची आजी श्रीमती इंदिराबाई खाडिलकर ह्या गंधर्व गायकीसाठी प्रसिद्ध. स्वातंत्र सैनिक, पत्रकार, नाटककार श्री. कृष्णाजी प्रभाकर उर्फ काकासाहेब खाडिलकर हे त्यांचे पणजोबा.
बालपणी त्यांनी विख्यात गायक, नट कै. डॉ वसंतराव देशपांडे यांच्याबरोबर ’कट्यार काळजात घुसली’ या संगीत नाटकामध्ये काम केले. त्याचबरोबर कै. शरद तळवलकर यांच्याबरोबर बालकलाकार म्हणुन ’सखी शेजारणी’ या विनोदी नाटकामध्ये काम केले. तसेच अष्टपैलु व्यक्तिमहत्त्व असलेल्या कै. पु. ल. देशपांडे यांच्या ’वाऱ्यावरची वरात’ या चंद्रलेखाचे मोहन वाघ द्वारा निर्मीत नाटकातही काम केले. त्याचबरोबर त्यांनी ’निवडुन’ या दैनंदिन मालिकेतही अभिनय केला.
त्यांनी इंडियन क्लासिक आणि नाट्य गीताचे शिक्षण आपल्या आजी कै. श्रीमती इंदिराबाई खाडिलकर आणि किरणा घराण्याचे गायक पंडित गंगाधरबुआ पिंपळखरे यांच्या कडून घेतले.
त्यांना ’गानहिरा’ हा सन्मान अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेद्वारा आयोजित अंतर महाविद्यालयीन शास्त्रीय गायनाच्या स्पर्धेमध्ये मिळाला.
त्यांनी HMV, T-Series, Tips, Venus, Universal, Prism, Magna sound इं कंपन्यांबरोबर हिंदी आणि मराठी अल्बम केले आहेत. ’बिच्छू बाइट’(विंचु चावला) हा युनिवर्सल द्वारा निर्मित त्यांनी आवाज दिलेला अल्बम खूप गाजला.
ते मराठीतील एक आघाडीचे पार्श्वगायक आहेत. त्यांनी दत्ता डावजेकर, अनिल मोहिले, श्रीधर फडके, राम-लक्षम, अशोक पत्की, अवधुत गुप्ते या सारख्या सर्व विख्यात संगीतकारांबरोबर काम केले आहे. त्यांनी जवळ-जवळ ३५ मराठी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले आहे. त्यांनी सुपरस्टार भरत जाधव यांना ’चालु नवरा भोळी बायको’ व मकरंद अनासपुरे यांना ’काय द्याच बोला’ या चित्रपटांसाठी आवाज दिला. त्यांनी संगीतकार आनंद मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली ’दिशा’ व संगीतकार बप्पी लहरी यांच्या मार्गदर्शनाखाली सदाबहार हिरो देव आनंद दिग्दर्शित ’मि. प्राय मिनिस्टर’ या हिंदी चित्रपटांसाठीही पाश्वगायन केले.
त्यांनी ६० पेक्षा ही जास्त मालिकांचो शीर्षक गीते गायिली आहेत (कोणत्याही गायकाने त्यांच्या इतपत मालिकांचे शीर्षक गीते गायिलेली नसतील.) त्यातील ’हम पांच’, ’चुटकी बजाके’, ’टिकल ते पॉलिटिकल’ या मालिकेचे शीर्षक गीते खुपच गाजली.
त्यांना TVS 'सा रे ग मा पा’चा (झी टी हिंदी) ’व्ह्युवर्स चॉइस अवार्ड’ मिळाला आहे.
त्यांना सुर सिंगर सनसदकडून ’लता मंगेशकर अवार्ड’ आणि अखिल भारतीय नाट्यपरिषदेकडून ’माणिक वर्मा अवार्ड’ मिळाले आहेत.
२००७ साली ’थैमान’ या मराठी चित्रपटासाठी त्यांना संस्कृती कला दर्पणचा उत्कृष्ठ पार्श्वगायकचा अवार्ड मिळाला आहे.
त्यांनी अनेक टीव्ही मालिकांचे सुत्रसंचालन केले आहे आहे जसे, ’आरोही’, ’गीताक्षरी’, ’नमन नटवरा’, ’टिकल ते पॉलिटिकल’ ह्या ई टीव्ही वाहिनी वरील काही मालिका तसेच, ’शेर-ए-नगमा’ ही ई टीव्ही उर्दु वाहीनी वरील मालिका होय.
त्यांनी अनेक टीव्ही मालिका व चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन केले आहे.
आशाजी, ओ.पी. नय्यर, सोनु निगम, कविता कृष्णमुर्ती, जॉनी लिवर तसेच डान्स मास्टर पं. बिरजु महाराजजी व उस्ताद झाकीर हुसैन यांच्या बरोबर त्यांनी भारतभर व भारताबाहेर अनेक कार्यक्रम केले आहेत.
’ओठावरली गाणी’ ह्या त्यांच्या मराठी गीतसंगीताच्या कार्यक्रमाचे ५०० च्यावर प्रयोग झाले आहेत. तसेच ’दिल ने फिर याद किया’ या त्यांच्या हिंदी गीत संगीताच्या कार्यक्रमाचे ३०० च्या वर प्रयोग झाले आहेत.
ई. टीव्ही. वरील गाजलेल्या ’स्वर संग्राम’ या संगीताच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी परिक्षक (गुरू) म्हणुन काम केले, तसेच सह्याद्री वाहिनी वरिल ’ट्रिक्स मिक्स रिमिक्स’ या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.
त्यांनी सुपरहिट मराठी चित्रपट ’काय द्याच बोला’ आणि ’जाऊ तिथे खाऊ’ साठी संगीत दिले आहे.
सोनी टीव्ही वरील उर्मिला मार्तोंडकर सुत्र संचालित रियालिटी शो ’वार परिवार’ या कार्यक्रमातील त्यांच्या अदाकारीची जबरदस्त तारिफ केली गेली.
ई टीव्ही वरील ’माय फेयर मेलोडी’ या संगीत कार्यक्रमातील त्यांचा सहभाग वाखनण्याजोगा होता.
मनिष राज या अमेरिकास्थित तरुणाने लिहिलेली गाणी व त्यांनी संगीत दिलेला ’मस्त....’ हा त्यांचा नुकताच रिलिझ झालेला मराठी रॉक अल्बम खूप गाजतो आहे.